सोलापूरच्या ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार मंदिर आणि मशिदी वरील अनधिकृत भोंगे काढण्याची विशेष मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये 581 मंदिरावरील आणि 357 मशिदीवरील अनधिकृत भोंगे असे एकूण 938 भोंगे काढण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रेस नोट च्या माध्यमातून दिली आहे. कुठेही तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन मंदिर तसेच मशिदीतील पदाधिकारी आणि विश्वस्तांना विश्वासात घेऊन ग्रामीण पोलिसांनी ही विशेष कामगिरी केली.

