सोलापूर – जामश्री रिअॅल्टी लि. चे व्यस्थापकीय संचालक व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेऊन इलिसियम क्लबच्या मानद सभासदत्वाचे कार्ड प्रदान करून स्वागत केले व सोलापुरातील आय.टी. उद्योगाचा विकास ,पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यावर सकारात्मक चर्चा केली .सोलापूरला उदयोन्मुख आय.टी. हब बनवण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दमाणी यांनी यावेळी दिले.यावर शासन जलद गतीने कार्यवाही करेल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली .

