• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, April 14, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाल बहादूर शास्त्री शाळेत चित्रकला व रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

by Yes News Marathi
April 14, 2026
in इतर घडामोडी
0
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाल बहादूर शास्त्री शाळेत चित्रकला व रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक, सोलापूर यांच्या वतीने लाल बहादूर शास्त्री शाळेत चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमासाठी आस्था रोटी बँकेचे संस्थापक विजय छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून चंचला आनंद खरात, डॉ. सोनाली घोंगडे तसेच राजू हौशेट्टी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महान कार्य केले. अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा देत त्यांनी सर्वांना समान हक्क मिळवून दिले. शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला.

याच अनुषंगाने, मुलांच्या आयुष्यात चांगले संस्कार घडवण्यासाठी आई-वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. आई मुलांना प्रेम, माया व मूल्यांची जाणीव करून देते, तर वडील शिस्त, जबाबदारी आणि ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा देतात. घरातील वातावरण, वागणूक आणि विचारसरणीचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांनी स्वतः आदर्श ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सौ. चंचला आनंद खरात व डॉ. सोनाली घोंगडे यांनी केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात चित्रकला व रंगभरण स्पर्धेत 300 विद्यार्थी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ कलागुण नव्हे, तर चांगले संस्कार आणि सामाजिक जाणीवही रुजते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
लालबहादूर शास्त्री शाळेचे उपमुख्याध्यापका दर्शना बाहुबली उपाध्ये प्रमुख उपस्थिती स्नेहा वनकुद्रे (शहराध्यक्ष आस्था रोटी बँक) , जिल्हाध्यक्ष नीलिमा हिरेमठ ,छाया गंगणे. सत्यम सोलापूरकर, सूत्रसंचालन स्वाती तांबवे, आभार प्रदर्शन रेवती डहाळे यांनी केले.

Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In