सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आमचा निधी अडवितात. मनमानी करतात. आमचे प्रस्ताव मंजूर न केल्यास पंधरा दिवसात त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला होता. याच अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. विकास कामांचा सव्वाशे कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला त्यातून पाकिस्तान मध्ये कामे केलीत का? तो निधी सोलापुरातच खर्च झाला आहे. प्रणिती ताई वारंवार माझ्यावर खालच्या स्तरावरची टीका करतात. डीपी डिसीचा ही कोणाच्या नावावर येत नाही.. मग तो पैसा सोलापुरात खर्च करू नये का… याचे तरी उत्तर प्रणिती शिंदे यांनी द्यावे असा टोला त्यांनी लगावला. एकूणच पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार प्रणिती शिंदे असा राजकीय सामना पुन्हा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळत आहे.

