• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर मनपाच्या 2026-27 अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चा सुरू; 23 ते 29 मार्चदरम्यान बैठकांचे वेळापत्रक जाहीर

by Yes News Marathi
March 23, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर मनपाच्या 2026-27 अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चा सुरू; 23 ते 29 मार्चदरम्यान बैठकांचे वेळापत्रक जाहीर
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिमखाना येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञनेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहर अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या नियोजनानुसार दिनांक २३ मार्च २०२६ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत विभागनिहाय अंदाजपत्रकावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार विविध विभागांसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

दि. २३/०३/२०२६ रोजी कर आकारणी व कर संकलन विभाग सकाळी १०:०० ते १२:०० तसेच भूमी व मालमत्ता विभाग दुपारी ०२:०० ते ०६:०० यांच्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

दि. २४/०३/२०२६ रोजी मंडई व कोंडवाडा विभाग सकाळी १०:०० ते ०१:०० तसेच आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभाग दुपारी ०२:०० ते ०६:०० यांचा आढावा घेतला जाणार आहे.

दि. २५/०३/२०२६ रोजी नगर अभियंता तथा संचालक नगर रचना, तसेच विद्युत विभाग सकाळी १०:०० ते १२:००, सामान्य प्रशासन विभाग दुपारी ०२:०० ते ०४:०० व उद्यान विभाग दुपारी ०४:०० ते ०६:०० यांच्यावर चर्चा होणार आहे.दि. २६/०३/२०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग सकाळी १०:०० ते ०२:०० तसेच पझोन क्र. १ ते ८ दुपारी ०२:०० ते ०६:०० यावर चर्चा करण्यात येणार आहे.

दि. २७/०३/२०२६ रोजी परिवहन विभाग सकाळी १०:०० ते ०२:०० तसेच मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ दुपारी ०२:०० ते ०६:०० यांचा आढावा घेतला जाणार आहे.

दि. २८/०३/२०२६ रोजी महिला व बाल कल्याण, मुख्यलेखापरीक्षक, नगरसचिव, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण विभाग सकाळी १०:०० ते सायं. ०६:०० यांच्यावर चर्चा होणार आहे.

तसेच दिनांक २३ मार्च ते २९ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० वाजल्यापासून बैठक सुरू राहणार आहे यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“सोलापूर शहराच्या विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक विभागाने जबाबदारीने व पारदर्शकतेने काम करणे गरजेचे आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने निधीचा वापर करून विकासकामांना गती देण्यात येईल.”बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकाभिमुख धोरणे राबवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

Next Post

पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर

Next Post
पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर

पूज्य मुनीश्रींच्या पावन सान्निध्यात आध्यात्म, आरोग्य व संस्कारमूल्यांचा जागर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In