• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, March 10, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोहिते- पाटील,उद्धव ठाकरे यांची आमदारकी दोन महिन्यात संपणार…!

by Yes News Marathi
March 10, 2026
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील नऊ जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे तसेच रणजीतसिंह मोहिते पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली होती. या नऊ जागांवर 13 मे 2020 रोजी निवडणूक होऊन आमदारांद्वारे मतदान करून त्यांची निवड करण्यात आली होती. विधान परिषदेतील त्यांचा सहा वर्षाचा कालावधी 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. एकीकडे मोहिते पाटील पुन्हा भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील शिंदे सेनेमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार की वेगळी भूमिका घेणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. शिवाय ते पुन्हा इच्छुक आहेत. शरद पवार यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली त्यामुळे आता आपणाला महाविकास आघाडीने पुन्हा विधान परिषदेची आमदारकी द्यावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात अनेक राजकीय घडामोडी होणार असे दिसते. या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदाररणजितसिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

देसाईनगर येथे 20 एमएलडी क्षमतेच्या मलनिसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात;महापौर विनायक कोंड्याल यांच्या कडून पाहणी…

Next Post

निमा सोलापूर शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड देऊन गौरव

Next Post
निमा सोलापूर शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड देऊन गौरव

निमा सोलापूर शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड देऊन गौरव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In