आरोपीची गाडी जप्त न करता त्याला मदत करण्यासाठी 35 हजारांची लाच घेताना एका जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .सचिन शिंदे असे अटक करण्यात आलेल्या जमादाराचे नाव आहे. सध्या तो पौड पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.शिंदे याला 35 हजार रुपयांची लाच घेताना पोलिस चौकीतच सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले. त्याने एका गुन्ह्यातील आरोपीच्या मदतीसाठी त्याच्याकडे एक लाखाची लाच मागितली होती. त्यानंतर 35 हजारावर तडजोड केली होती. सचिन बाळासाहेब शिंदे,वय 45,रा.सुसगाव,ता.मुळशी, जि.पुणे याला पुणे एसीबीचा ट्रॅप न झाल्याने या प्रकरणात ही कारवाई सोलापुरच्या एसीबी युनीट ने केल्याचे समजते. पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी लाचेच्या या कारवाईला दुजोरा दिला आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील ही लाचखोरी असल्याने त्यावर कारवाई पुणे एसीबीने केली नाही, तर जिल्ह्याबाहेरील सोलापूर एसीबी युनीट ने केली.
