• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर शहरातील दुहेरी हत्याकांडाचा सुमारे ०७ महीन्यानंतर उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीसांना यश

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2026
in इतर घडामोडी
0
पंढरपूर शहरातील दुहेरी हत्याकांडाचा सुमारे ०७ महीन्यानंतर उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीसांना यश
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – दि. १५/०७/२०२५ रोजी रात्रौ ०९:३० वा. चे पुर्वी पंढरपूर शहरातील कुभांर गल्ली येथे १) सुरेखा संजय जगताप वय ४५ वर्षे, २) लखन संजय जगताप वय २६ वर्षे दोघे रा. शिंद नाईक नगर, कुंभार गल्ली पंढरपूर यांना कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून धारदार शस्वाने डोकीत, अंगावर मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते. त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४६७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३, २३८ प्रमाणे दि. १६/०७/२०२५ रोजी ०२:०६ वा. गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास सुमारे ०७ महीन्यापासून चालु होता. दि १८/०१/२०२६ रोजी सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे यांनी स्वतःकडे घेवून स्थानिक गुन्हे शाखा व एसडीपीओ कार्यालयाकडील पथक यांच्या मदतीने गुन्हयातील निष्पन्न मोबाईलचे डमडाटा, सीडीआर, एसडीआर, लोकेशन याची माहीती घेतली. घटनेवेळी परिसरातील काही लोकांचे मोबाईल इनअॅक्टीव्ह असल्याचे दिसून आलेने गुन्हयाच्या घटनेवेळी त्यांच्या हालचालीची पडताळणी केली. त्याच दरम्यान बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हयातील संशयीत विधीसंघर्षग्रस्त बालक व आरोपी क्रमांक १ व २ यांनी अपराध केल्याबाबतचा पुरावा मिळाला,

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकास जोधपूर रा. राजस्थान येथे पाठवून आरोपी नं. ०१ यास ताब्यात घेवून प्राथमिक चौकशी करता त्याने अपराधाची कबुली दिली. त्यानंतर आरोपी नं. ०२ यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता, त्याने सुरूवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यानी कौशल्यपुर्ण चौकशी करून आरोपीतांकडून माहीती प्राप्त करून घेवून ०७महीन्यापुर्वी घडलेल्या गंभीर गुन्हयाची उकल करण्यात यश मिळविले आहे.

गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीतांनी चंद्रभागा नदीच्या पात्रात गुन्हयात वापरलेली हत्यारे व मयताचे घरातील टिव्ही फेकून दिल्याचे तपासा दरम्यान सांगितले. त्याप्रमाणे नदिपात्रात ज्या ठिकाणी आरोपीतानी हत्यारे व टिव्ही टाकला त्याची आरोपीकडून माहीती घेवून शोध मोहीम राबविली असता, दि. १०/०२/२०२६ रोजी गुन्हयातील ५५ इंची टेलीव्हीजन संच फुटलेल्या स्थितीत व दि.११/०२/२०२६ रोजी धारदार तिक्ष्ण हत्यार मिळून आल्याने महत्वाचा पुरावा पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला आहे.

यातील आरोपी क्रमांक २ याचे व मयत यांचे मध्ये जागेचा वाद होता व अनैतिक संबंधाचे एक कारण असलेचे तपासादरम्यान माहिती मिळत आहे.

सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक, प्रितम यावलकर, सहा पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोसई/अब्दुलहमीद शेख, सपोफी/शरद कदम, पोहेकों/सुरज हेवाडे व स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण कडील सपोनि/विजय शिंदे, पो अंमलदार प्रकाश कारटकर, नारायण गोलेकर, मोहन मनसावले यांनी पार पाडलेली आहे.

Previous Post

अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ च्या अधिकृत लोगोचे दिमाखात अनावरण

Next Post

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

ताज्या बातम्या

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026