• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ६३ लाख ३६ हजारांची फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
January 23, 2026
in इतर घडामोडी
0
ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ६३ लाख ३६ हजारांची फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर – शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोलापूर येथील ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६३ लाख ३६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनमंत बळीराम कोकरे वय ६१ वर्षे, रा. धम्मश्री मागासवर्गीय सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार आरोपी शांतिलाल शहा याने रिलायन्स इंडस्ट्रीज सोलापूर इन्व्हेस्टमेंट स्कीमच्या नावाखाली व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे भासवले.

आरोपीने विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला काही प्रमाणात नफा देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दि. ०७/१०/२०२४ रोजी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून १०,००० रुपये तसेच दि. १४/१०/२०२४ रोजी २०,००० रुपये अशा विविध टप्प्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करून घेतली. यामध्ये आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांनी संगनमताने शेअर मार्केटमधून नफा मिळत असल्याचा आभास निर्माण करत फिर्यादीकडून मोठी रक्कम उकळली.
अखेर फिर्यादी यांची एकूण ६३,३६,००० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. पैसे परत न मिळाल्याने तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस गजा (मो. नं. ९०९५८०१००) हे करीत असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

Previous Post

पहिल्या दिवस अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या डावात नाबाद 47 धावा, त्रिपुराचा पहिला डाव 209 धावात संपुष्टात.

Next Post

दावोस दौरा १०० टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार – उद्योगमंत्री सामंत

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
दावोस दौरा १०० टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार – उद्योगमंत्री सामंत

दावोस दौरा १०० टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार – उद्योगमंत्री सामंत

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026