ऑपरेशन केलेल्या ‘कमळाला” बसू शकतो फटका
सोलापूर महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जागांची मागणी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ 10 जागा देण्यावर पसंती दिली आहे.

माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाने अगोदरच नाराज झालेले देशमुख आमदारद्वय यांनी बंडाचा झेंडा रोवला असून त्यांचे कार्यकर्ते सेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपाने जागेबाबत शिंदेसेनेशी तडजोड न केल्यास सोलापुरात भाजपाला फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

