पुणे महानगरपालिकेत दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या,परंतु ‘घड्याळ’ चिन्हामुळे ही युती संपुष्टात आली आहे.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने देखील घड्याळावरच निवडणूक लढवावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह होता.सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्हावर लढण्यापेक्षा महाविकास आघाडीत लढू असे सांगत युती तुटल्यावर शिक्कामोर्तब केले.

