भाजी कडाडल्या
शेतकरी राजासह सर्वांचा उत्साहाचा दिवस म्हणजे वेळा अमावस्या..

ग्रामीण भागातला आनंदाचा सण! कडाक्याच्या थंडीमध्ये पारा नीच्चांकी असताना भाज्यांचे दराने मात्र उच्चांक गाठला आहे.वेळा अमावस्याचा मुख्य मेनू ‘भजी’ करण्यासाठी शहरातील सर्व मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे.विविध फळभाज्या, पालेभाज्या, गावरान बोरं, रानभाज्या, वांगी, गवारी, वाल्याच्या शेंगा, हरभरा, गाजर, घेवडा एकत्र करून बनवलेल्या मिक्स भजीची चव न्यारीच लागते.

या पार्श्वभूमीवर वांगी, गवार, भेंडी, यांच्या दराने शंभरी पार केली असून इतर सर्व पालेभाज्या देखील 50 च्या घरात पोहोचल्या आहेत.या भजी सोबत बाजरीची भाकरी, ज्वारी – बाजरीचे गोलाकार उंडेचा आस्वाद घेत पंगती शिवाराशिवारात झडत असतात.डहाळे, रान बोरं, ऊस, चिंचा आदी रानमेव्यांनी वेळअमावस्याची रंगत वाढते.

