• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप

by Yes News Marathi
December 17, 2025
in इतर घडामोडी
0
विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे :‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था’ तसेच ‘मिराकी इव्हेंट्स’ यांच्या वतीने ‘बढेकर ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर येथील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या डॉ. आपटे वसतिगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप मंगळवार (ता. १६) रोजी करण्यात आले.

यावेळी प्रवीण बढेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “जे काही कराल ते प्रामाणिकपणे आणि कष्टाने करा. मदत करून ती विसरून जाणे, या मताचा मी आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्न करूया. आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवले की, कमावलेल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम सामाजिक भान म्हणून समाजकार्याकरिता खर्च करावी. सामाजिक कार्य करत असतानाच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे’ संस्थापक अध्यक्ष समाधान काटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सामाजिक कार्यकर्ते उमेश वाघ तसेच समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला समितीचे मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक रणजित बोत्रे तसेच ‘मिराकी इव्हेंट्स’च्या संचालिका स्वाती पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रेरणा मालुसरे आणि श्रावणी घोलप या विद्यार्थिंनी सूत्रसंचालन करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.

Previous Post

अजित पवारांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत:राज्यातील राजकारणाचं केंद्रबिंदू ठरल्या महानगरपालिका निवडणुका

Next Post

सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ इंगळे महाराज

Next Post
सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ इंगळे महाराज

सोलापुरातील अध्यात्मिक स्तंभ इंगळे महाराज

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In