शेतकरी संघटनेने बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत बसून तीन दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांसमोर लोकमंगलच्या वतीने सतीश देशमुख, महेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन पिसे यांनी चर्चा केली.चर्चेत दर जाहीर न करण्याची भूमिका सतीश देशमुख यांनी घेतल्याने आंदोलक शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले.तीन हजार रुपये पहिली उचल जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भुमिका प्रभाकर देशमुख, विजय रणदिवे, सचिन पाटील, दीपक भोसले, दीपक पवार यांनी घेतली.

