सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात जर पालिकेचा एखादा कर्मचारी, शिक्षक, खाजगी शिक्षण संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध शासकीय विभागाचे कर्मचारी दिसून आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती तेव्हा त्यांनी अशा कर्मचाऱ्यांचे फोटो पाठवा, त्यांना तात्काळ निलंबित करून असे आश्वासन दिले.

