सोलापूर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आठ समितींची घोषणा केली.
मिरवणूक समितीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, जागावाटप समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश बिराजदार, शोभेच्या दारूकाम समितीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट व्ही एस आळंगे, प्रचार आणि प्रसिद्धी समिती अध्यक्षपदी प्राध्यापक राजशेखर येळीकर, प्रसाद वाटप समितीच्या अध्यक्षपदी रतन रिक्के, रंग आणि विद्युत रोशनी समितीच्या अध्यक्षपदी शिवकुमार पाटील, जनावरांच्या बाजार समितीच्या अध्यक्षपदी नीलकंठप्पा कोनापुरे तर कृषी प्रदर्शन समितीच्या अध्यक्षपदी गुरुराज माळगे यांची निवड करण्यात आली आहे.या सर्व समितीत पाच-सहा सदस्य देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

