एका दिवसात साडेअकरा हजार रुपयांची वाढ
बुलियन बाजारात बुधवारी चांदीच्या किमतीने विक्रमी झेप घेत नवा उच्चांक गाठला.चांदीचा दर तब्बल 11 हजार 500 रुपयांनी उसळी घेत एक लाख 92 हजार रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरामध्ये आठशे रुपयांनी वाढ होऊन एक लाख 32 हजार 400 रुपये इतका दर नोंदवला गेला.

