• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आमदार देवेंद्र कोठे विधानसभेत आक्रमक
0
SHARES
1
VIEWS

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर ईशान्य प्रवेशद्वार अतिक्रमणमुक्त करून सुशोभीकरणासाठी अतिरिक्त १० कोटी निधीची आमदार देवेंद्र कोठे यांनी केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधीशहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे बुधवारी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत चांगलेच आक्रमक झाले. सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्वतः मंजुरी दिलेल्या ८९२ कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरात लवकर काढण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे आग्रह धरला. तसेच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वारा समोरील अतिक्रमण काढून हा परिसर सुशोभित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही आमदार कोठे यांनी यावेळी केली.आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, समांतर जलवाहिनी पूर्ण होण्यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या, अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था यासाठी ८९२ कोटी रुपयांची आवश्यकता होती.

या मागणीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. ७ मार्च रोजी झालेल्या बजेट अधिवेशनाच्या काळात याबाबत बैठक आयोजित करून हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला तांत्रिक मान्यता देखील मिळाली. परंतु हा हे काम कोणत्या हेडमधून काम मंजूर करावे याबाबत वित्त सचिव आणि अन्य सचिवांमध्ये मतमतांतरे होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहर हे महत्त्वाचे शहर असून ही पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत करायची आहे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री जयकुमार गोरे देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याकामाची निविदा आगामी आठ दिवसात काढण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिलेले आहे. मात्र प्रथम आणि दुसऱ्या टप्प्यातील निधीची तरतूद लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठीच्या व्यवस्थेचे काम वेळेत पूर्ण होईल, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.त्याचबरोबर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात लोकसहभागातून बांधलेला तलाव आणि कालांतराने तेथे बांधण्यात आलेले मंदिर हे अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे आहे.

या मंदिराच्या ईशान्य प्रवेशद्वाराला असलेल्या लक्ष्मी मार्केट परिसरातील अतिक्रमण काढून हे प्रवेशद्वार आणि हा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने द्यावा. सोलापूरला लागून असलेल्या अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर अशा मंदिरांना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. श्री सिद्धरामेश्वर मंदिर आणि परिसराचा विकास झाला तर हे भाविक सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. त्यामुळे शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केली.

पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे आमदार देवेंद्र कोठे यांनी कौतुक करत मानले आभार

सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. त्याकरिता बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना सोबत घेऊन नागपुरातील हैदराबाद हाऊस (मुख्यमंत्र्यांचे कार्यालय) येथील कार्यालयात मुख्य सचिवांची भेट घेतली. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. यानंतर मुख्य सचिवांनी गोविंदराज यांना याबाबत निर्देश दिले. यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी गोविंदराज यांचीही भेट घेतली. तसेच महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनाही याबाबत सूचना केल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचा पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करत असलेल्या धडपडीबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.

Previous Post

पाडकामाची प्रक्रिया सुरू, दमाणीनगर नवा रेल्वे ब्रिज ‘असा’ असेल..!

Next Post

चांदीची वाटचाल दोन लाखाकडे

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
चांदीची वाटचाल दोन लाखाकडे

चांदीची वाटचाल दोन लाखाकडे

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026