सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यांनी जवळपास 47 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप देखील केले. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व साखर कारखानदारांना ऊसाची एफ आर पी जाहीर करण्याचे आदेश दिले होते मात्र या 33 पैकी अद्याप 16 साखर कारखानदारांनी भाव जाहीर केले नाहीत. बऱ्याच साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडून दिले जाणारे गाळप परवाने घेतले नाहीत तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे एफ आर पी जाहीर करा याबाबतचे आदेश पाळले नाही तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस दर जाहीर न करणाऱ्या कारखान्याचे गाळप बंद पाडू असा इशारा कालच सोलापुरात दिला आहे. त्यामुळे कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटनांचे आंदोलन सोलापूर जिल्ह्यात चिघळण्याची चिन्हे आहेत.

