• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 6, 2025
in इतर घडामोडी
0
५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा..
0
SHARES
0
VIEWS

कुमार गटात धाराशिव वि. पुणे व सोलापूर वि.सांगली तर…

मुली गटात धाराशिव वि. ठाणे व सोलापूर वि.सांगली उपांत्य फेरीत भिडणार…

अहिल्यानगर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यांचा थरार शिगेला पोहोचला आहे. कुमार गटात धाराशिव, पुणे, सांगली व सोलापूर संघानी तर मुलींच्या गटात धाराशिव, ठाणे, सोलापूर आणि सांगली या संघानी उपांत्य फेरी गाठत आपले वर्चस्व सिद्ध केले. सर्व सामने उच्च दर्जाची झुंज, रणनीती व जिद्दीचा उत्तम मिलाफ घडवणारे ठरले. येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत वेग, चातुर्य आणि मनोबळाची खरी परिक्षा पाहायला मिळाली.

उपउपांत्य फेरीच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात धाराशिवने मुंबईवर १ डाव ३३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. मध्यंतरासच धाराशिवकडे ५ ड्रिम रनसह ४२-६ अशी मोठी आघाडी होती. धाराशिवकडून जितेंद्र वसावे (३.४० मि. संरक्षण व ६ गुण), विशाल वसावे (३.०० मि. संरक्षण व ४ गुण) राज जाधव (२.२० मि. संरक्षण व तब्बल १६ गुण) यांनी तर पराभूत मुंबईच्या प्रसाद घाडीगांवकर (४ गुण) सामन्यात एकार्फी कामगिरीची नोंद केली.

दुसऱ्या सामन्यात सोलापूरच्या धारदार आक्रमणामुळे ठाण्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सोलापूरने ४ गुणांनी निसटता विजय मिळविला. सोलापूरकडून शंभुराजे चंदनशिवने १.४० मि. संरक्षण करून आक्रमणात १० गुण मिळवले. सुहान आत्तारने २.१० मि; सिद्धार्थ मानेने १.५० मि. तर अकबर शेखने २.३० मि. संरक्षण केले. ठाण्याच्या आशिष गौतमने दोन्ही डावात प्रत्येकी २ मि. संरक्षण करून आक्रमणात ८ गुण संपादन करून एक हाती लढत दिली. ओंकार सावंतने १ , १.१० मि. संरक्षण करून आक्रमणात ६ गुण मिळवले.

तिसऱ्या सामन्यात मध्यंतरातच २५-१२ अशी आघाडी घेणाऱ्या पुणे संघाने मुंबई उपनगर संघावर २६-२४ असा १ डाव २ गुणांनी मात केली. पुणे संघाकडून शंकर यादव १.४० व १.३० मि. संरक्षण आक्रमणात ८ गुण, श्री वसावेने १.२० व १.४० मि. संरक्षण केले. आदेश पाटीलने १.३० व १.५० मि. संरक्षण करताना आक्रमणात ४ गुण मिळवले. उपनगर संघाकडून अर्जुन सर्जेरावने १.०० मि. संरक्षण करीत आक्रमणात ४ गुण मिळवले.

चौथ्या सामन्यात सांगलीने सातारा संघाला ५०-२४ असे २६ गुणांनी पराभूत केले. विजयी संघाकडून अथर्व पाटीलने १.३० मि. पळतीचा खेळ करत ६ गुण मिळवले. गणेश परेकरने १.४०, २ मि. पळतीचा खेळ करत ६ गुण मिळवले. पार्थ देवकातेने १.३०, १.२० मि. पळतीचा खेळ करत १० गुण मिळवले. तसेच सातारा संघाकडून प्रेम लोखंडेने २ मि. खेळ करत २ गुण तर लोकेश जाधवने १.४० मि खेळ करत २ गुण आणि तबरेज खानने १.४० मि. खेळ करत ८ गुण मिळवले.

मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात सोलापूरने साताऱ्यावर २९-२२ असा ५.२० मि. राखून ७ गुणांनी विजय मिळविला. सोलापूरकडून खेळताना स्नेहा लामकाने ५.१० व १२ गुण, अश्विनी मांडवेने १.३५ मि. संरक्षण व ४ गुण तसेच कल्याणी लामकाने हिने १.५०, १.४५ मि. संरक्षण व २ गुण मिळवले. साताऱ्या कडून संचिता गायकवाडने १.३०, १.४० मि. संरक्षण व ८ गुण मिळवले.

धाराशिव विरुद्ध रत्नागिरी या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात धाराशिव संघाने ३२-२७ असा ५ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिली पवारने ३.५०, ३.४९ मि. संरक्षण करत आक्रमणात १६ गुण मिळवले. सिद्धी भोसलेने १.१० मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. राही पाटीलने १.४० मि. २.२० मि. संरक्षण करून दोन गुण संपादन केले. रत्नागिरीतर्फे सायली कर्लेकरने १.४०, १.२० मि. संरक्षण करत २ गुण, साक्षी लिंगायत १.४० संरक्षण करत २ गुण, श्रावणी सनगरेने १.१० मि., दिव्या सनगले १ मि. खेळ केला. आक्रमणात वैष्णवी फुटकने १० गुण, दिव्या पाल्येने ८ गुण तर तन्वी खानविलकरने ४ गुण मिळवले.

ठाणे विरुद्ध नाशिक या तिसऱ्या सामन्यात ठाणे संघाने १३ गुण आणि ४.३० मिनिटं राखून विजय मिळविला. ठाणे संघाकडून धनश्री कंकने ३.१० मिनिटे संरक्षण केले. श्रुती चोरमारेने २.५५ मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. दीक्षा काटेकरने १.३० मि. संरक्षण करून सहा गुणांची कमाई केली. प्रणिती जगदाळेने २.१०, नाबाद २.३० मि. संरक्षण करून आक्रमणात दोन गुण मिळवले. नाशिक संघाकडून नीलम महाडकरने २.३०, १.१५ मि. संरक्षण करून आक्रमणात दोन गुण मिळवले.

चौथ्या सामन्यात सांगलीने पुण्याला १५-२९ असे १४ गुणांनी नमविले. सांगली कडून श्रावणी तामखडे हिने ३.३० मि. संरक्षण केले. धनश्री तामाखडेने २.५० मि. संरक्षण व आक्रमणात ४ गुण, चाफे सानिका २.५० मि. संरक्षण व आक्रमणात २ गुण तर कृत्तिका अहिरने ३.४० मि. संरक्षण व आक्रमणात २ गुण मिळवले. पुण्याकडून अपर्णा वर्धेने २.२० मि. संरक्षण, धनश्री लव्हाळने १.५० मि.संरक्षण व ४ गुण मिळवले.

Previous Post

मंगळवारपासून दमाणीनगरच्या रेल्वे ब्रीजवरून नो- एन्ट्री, होणार प्रचंड वाहतूक कोंडी..!

Next Post

पुणे नाका येथील स्मशान भूमित स्वच्छता मोहिम..

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
पुणे नाका येथील स्मशान भूमित स्वच्छता मोहिम..

पुणे नाका येथील स्मशान भूमित स्वच्छता मोहिम..

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026