सोलापुरातील औद्योगिक वसाहतीतील आय एम सी कंपनीत प्रक्रिया होणारा सीएनजी गॅस प्लांटमध्ये दुरुस्ती निघाल्याने सोलापुरातील सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.सोलापूर शहर तसेच ग्रामीण विभागातील सीएनजी पंप यामुळे गेल्या दोन दिवसापासून बंद आहेत. वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून सीएनजीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या अआणीबाणी स्थितीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने काल बुधवारी तातडीने आय एम सी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला आणि दोन दिवसात पुरवठा सुरळीत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. औद्योगिक वसाहतीत प्रक्रिया होणार सीएनजी गॅस सहवितरकांना उपलब्ध करून देण्यावर भर दिला असून सर्व पंपावरील पुरवठा लवकरात लवकर सुरळीत होईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले.सोलापूरला 100 मेट्रिक टन सीएनजी ची गरज असून केवळ 75 ते 80 मेट्रिक टन एवढाच पुरवठा होत आहे.

