• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 421 धावांच्या प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशची पडझड…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2025
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 421 धावांच्या प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेशची पडझड…
0
SHARES
1
VIEWS

दुसऱ्या दिवस अखेर 7 बाद 200 धावा, अद्यापि 221 धावांनी पिछाडीवर…

सुआशिक चे शतक तर शुभम कदम चे अर्धशतक हुकले, अंश धीमनचे 4 बळी…
महाराष्ट्राच्या अनिश जोशी जबरदस्त गोलंदाजी तर अर्पित सिंगचे संयमी अर्धशतक व आर्यन ठाकूरची टिकाऊ खेळी…

सोलापूर येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर काल पासून सुरू झालेल्या BCCI 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात दुसऱ्या दिवशीच्या खेळात महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्व बाद 421 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा हिमाचल प्रदेशने 7 बाद 200 धावा केल्या असून अद्यापि 221 धावांनी पिछाडीवर आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात नाबाद जोडी ने खेळ पुढे सुरू केला पण 5व्याच षटकात शुभम कदम (47) ला अंश ने यष्टिरक्षक कर्णधार आदित्य कटारिया कडे झेल देण्यास भाग पाडले आणि जोडी फोडली, दोघांनी 8व्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या तळातील फलंदाज अनिश जोशी ने देखील ताबडतोब फटकेबाजीला सुरुवात केली. संयमी फलंदाजी करत असलेल्या सुआशिक ला अक्षय वशिष्ठ ने त्रिफळाचित बाद करत त्याचे शतक हुकवले. जगताप ने 143 चेंडूत 7 चौकार सह 87 धावा केल्या. अंतिम खेळाडू हर्षिल सावंत सोबत अनिश ने धावफलक हलता ठेवत 421 पर्यंत धावसंख्या नेली पण तेंव्हाच तो पायचीत झाला आणि तासाभरात 67 धावा करत महाराष्ट्राचा पहिला डाव 107व्या षटकात संपुष्टात आला.हिमाचल प्रदेश कडून 15 अतिरिक्त धावा देताना अंश धीमन 84/4 बळी, नौनिहाल आर. 100/3 बळी, अक्षय वशिष्ठ 70/2 बळी तर आर्यन ठाकूर ने 1 बळी मिळवला.

दोन डाव्यांच्या मधल्या वेळेनंतर लगेच हिमाचल प्रदेश चा पहिला डाव सुरू झाला आणि मध्यमगती गोलंदाज अनिश जोशी ने आपला जादुई स्पेल सुरू केला व दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षय शर्माला बाद करत झटका दिला. त्यानंतर जेमतेम 32 धावांची भागीदारी करत असताना पुन्हा अनिश ने कर्णधार आदित्य कटारिया जो चेंडू गणिक धावा करत होता.

जेवणानंतर खेळ सुरू झाला आणि पुन्हा अनिश ने आपली जादुई गोलंदाजी कायम राखत 16 व्या षटकात 2 चेंडूच्या फरकाने अरमान विज, अक्षय वशिष्ठ यांना शून्यावर माघारी धाडले व पहिले चारही बळी मिळवले. त्याच्याच सोबत मग हर्षिल सावंत ने देखील सचिन मेहता (1) याला पण यष्टिरक्षक करवी झेलबाद केले आणि दोघांनी मिळून हिमाचलचा निम्मा संघ केवळ 54 धावांत गारद केला.

सलामीचा फलंदाज अर्पित सिंग याने नौनिहाल सोबत थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न चालू ठेवला पण पुन्हा सावंत ने झटका दिला तो नौनिहाल (9) ला बाद करत.त्यानंतर आलेल्या आर्यन ठाकूर ने मात्र सलामीवीर अर्पित सिंग सोबत संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या चहापान पर्यंत 6 बाद 134 केली.

चहापान नंतर पुन्हा दोघांनी उपयुक्त अशी संयमी फलंदाजी चालूच ठेवली आणि दरम्यान अर्पित ने त्याचे अर्धशतक पूर्ण करत हिमाचलची होणारी पडझड थांबवली. दोघांच्या दरम्यान 87 धावांची भागीदारी आणि 160 धावा झाल्या असताना शुभम कदम ने अर्पित (74, 165 चेंडू, 11 चौकार) याला त्रिफळा बाद केले व मोठा अडसर दूर केला.

हिमाचलच्या आर्यन सोबत आणखी एक ठाकूर, लक्ष्य फलंदाजीला आला व दोघांनी एक दोन धावा करत शेवटच्या सत्रात तासाभरात 40 धावांची भागीदारी रचत 200 धावांचा टप्पा गाठला असून महाराष्ट्राने फॉलोऑन लादण्यासाठी उर्वरित 3 खेळाडू 71 धावांत बाद करण्याची गरज आहे.तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर जमलेली जोडी फोडून हिमाचल संघाला सर्व बाद करण्याची संधी महाराष्ट्र संघ किती षटकात मिळवतो ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Previous Post

सोलापुरातील 10 ही नगरपरिषदांमध्ये शांततेत मतदान

Next Post

केंद्राचा ‘संचार’ नकोच…

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
केंद्राचा ‘संचार’ नकोच…

केंद्राचा 'संचार' नकोच…

ताज्या बातम्या

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026