• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, August 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मसाप सोलापूर शाखा स्मृती साहित्य पुरस्कार २०२५

by Yes News Marathi
August 6, 2025
in इतर घडामोडी
0
मसाप सोलापूर शाखा स्मृती साहित्य पुरस्कार २०२५
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांची पहिली शाखा ४ ऑक्टोबर १९४२ मध्ये सोलापूरला सुरु झाली. या शाखेने मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी व मराठी भाषिकांमध्ये वाङ्मयीन अभिरुची निर्माण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत तसेच प्रतिवर्षी वेगवेगळे साहित्य उपक्रमही राबवले आहेत. त्यात प्रामुख्याने गेली सत्तावीस वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषद व शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक यांच्या संयुक्त विद्यमाने 17, 18 व 19 डिसेंबर रोजी व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानाला महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. महावि‌द्यालयीन वि‌द्यार्थ्यांसाठी “श्रावणधारा”, ही काव्य स्पर्धा ज्यामध्ये शेकडो तरुण-तरुणी, वि‌द्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग नोंदवतात. याशिवाय मला भावलेले पुस्तक, कवी संमेलने, ग्रंथ प्रदर्शन, वाचन संवाद अशा वेगवेगळ्या उपक्रमातून साहित्य चळवळ राबवली जाते..

यासाठी शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य सक्रिय सहभाग घेतात.

या वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीने आम्ही काही मराठी साहित्य पुरस्कार सुरु करत आहोत. सोलापुरात असे साहित्य पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात येत आहेत..

याची माहिती खालील प्रमाणे आहे..

१) प्रसिद्ध लेखिका विजयाताई जहागीरदार स्मृती साहित्य पुरस्कार – हा पुरस्कार विजयाताई जहागीरदार यांच्या परिवाराने पुरस्कृत केलेला असून तो उत्कृष्ट मराठी कवितासंग्रहास दिला जाणार आहे.
[11:50 AM, 8/6/2025] Viju Aavte Sir: २) निर्मलालाई उत्तरेश्वर मठपती स्मृती साहित्य पुरस्कार हा पुरस्कार श्री उत्तरेश्वर मठपती यांनी पुरस्कृत केला असून तो उत्कृष्ट मराठी कथासंग्रहास दिला जाणार आहे.

३) प्राचार्य मधुकर कृष्णाजी झांबरे स्मृती साहित्य पुरस्कार हा पुरस्कार विजयाताई मधुकर झांबरे यांनी पुरस्कृत केला असून तो मराठीतील ललितगद्य या साहित्य प्रकाराला दिला जाणार आहे. (यामध्ये पर्यावरण व पर्यटन साहित्य कृतीला जास्त महत्त्व दिले जाईल.)

४) हॉटेल सूर्या एक्झिक्यूटिव्ह उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हा पुरस्कार हॉटेल सूर्या एक्झिक्यूटिव्हने पुरस्कृत केला असून तो मराठीतील अनुवादित साहित्य कृतीला दिला जाईल.

५) श्रीमती कमला श्रीवल्लभ चंडक स्मृती साहित्य पुरस्कार हा पुरस्कार प्रसिद्ध उ‌द्योजक श्री किशोर श्रीवल्लभ चंडक यांनी पुरस्कृत केला असून तो मराठीतील उत्कृष्ट कादंबरीला दिला जाणार आहे..

या सर्व पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रुपये 5000/, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असणार आहे..

सदर पुरस्कारासाठी कथा, कादंबरी, कविता, ललित गद्य व अनुवादित साहित्य या मराठी साहित्य प्रकारातील पुस्तके विचारात घेतली जातील

या साहित्यकृती दि. 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीतच प्रकाशित झालेल्या असाव्यात.

पुस्तके डिजिटल किंवा पीडीएफ काढून प्रकाशित झालेली नसावीत.

वरील साहित्य प्रकारांपैकी कोणत्याही एकाच साहित्य प्रकाराचे पुस्तक पाठवावे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठ, मलपृष्ठ अथवा आतील पानावर काहीच लिहिलेले नसावे. तसे असल्यास सदर पुस्तक पुरस्कारासाठी अपात्र ठरविण्यात येईल.

पुरस्कारांसाठी पाठवलेली पुस्तके कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाहीत.

पुरस्कारांसाठी पुस्तकाची निवड परीक्षक समितीकडून होईल. सदर समितीचा निर्णय अंतिम व सर्वांनाच बंधनकारक राहील.

पुरस्कारस्वीकृती साठी साहित्यकाराने स्वतः उपस्थित रहावे. प्रतिनिधींना पाठवू नये.

पुरस्कार पुस्तकाला असल्याने अर्ज, परिचय व फोटो वेगळे पाठवावे.

पुरस्कार वितरण सोलापूर येथे होणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते होईल. समारंभाची तारीख व स्थळ यथावकाश कळविण्यात येईल.

सदर पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती श्री किशोर चंडक, कार्याध्यक्ष, मसाप शाखा सोलापूर, मंत्रीचंडक कार्यालय, जवाहरलाल नेहरू वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर 413001, या पत्त्यावर 10 सप्टेंबर 2025 पर्यंत पाठवाव्यात. नंतर आलेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात नाही..

Previous Post

शिक्षण मंत्र्यांनी लावली बैठक ;शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मांडल्या या अडचणी

Next Post

प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता - उपमुख्यमंत्री अजित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group