सोलापूर- मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील जेऊर आणि पुणे स्टेशन दरम्यान नियमित प्रवाशांना परवडेल असा उपक्रम हाती घेतला आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर जेऊर-पुणे मार्गासाठी सीझन तिकिटे सुरू केली आहेत.
दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी पूर्ण झाली असून ज्यामुळे त्यांना किफायतशीर आणि त्रासमुक्त प्रवास पर्याय उपलब्ध झाला आहे. सीझन तिकिटे दैनंदिन प्रवास खर्चात लक्षणीयरीत्या घट करतात, जलद तिकीट सुविधा सुनिश्चित करतात आणि काम, शिक्षण किंवा इतर दैनंदिन गरजांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक फायद्याचे ठरते.
हि तिकिटे रेल्वे स्थानकावरून काढून घेता येतील. तसेच जेऊर मधील प्रवाशांना आता या सुविधेचा लाभ घेता येईल. तरी या मार्गिकेवर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची याच लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.










