• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा ; राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2025
in इतर घडामोडी
0
राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौरा ; राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

शेतक-यांनी दि. 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करावेत

सोलापूर – राज्यातील शेतक-यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादीत होणा-या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतक-यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतक-यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. त्यानुसार सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतक-यांचे देशाबाहेरील अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत युरोप- नेदरलँड, जर्मनी, फ्रांस, स्वित्झलँड, इस्त्राईल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया फिलीपाईन्स, चीन, द. कोरीया, इत्यादी संभाव्य देशाची निवड करण्यात आली आहे. शेतकरी अभ्यास दौ-याकरिता शेतक-यांनी दि. 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.

या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत.

       अभ्यास दौ-याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.  शेतक-यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे  तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2) शेतक-यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. 

निवडलेल्या लाभार्थी शेतक-यांने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणा-या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व 18 वर्षांखालील मुले/मुली) , शेतक-यांने त्यांच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतक-यांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्ष पूर्ण असावे, कमाल वयाची अट नाही परंतु, शेतकरी शारीरिकदृष्टया तंदरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी सदर योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्टया तंदरुस्त असल्याबाबतचे वैदयकीय प्रमाणपत्र (किमान एम. बी. बी. एस. डॉक्टरचे सादर करावे). शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत / वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापुर्वी किमान तीन महिनेपेक्षा जास्त असावी.
तसेच शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकांऊंट) अभियंता, कंत्राटदार इ. नसावा तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2). शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र / राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापीठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2). शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषि विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषि आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतक-यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
शासनाकडून अभ्यास दौ-याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतक-यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु.1.00 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. सदर दौराकरिता जिल्हयाला 5 शेतक-यांचे लक्षांक असून यामध्ये जिल्हयात एक महीला शेतकरी व एक केंद्र व राज्य स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतक-याची निवड करणे अनिवार्य आहे. लक्षांक मर्यादेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारीनुसार शेतक-यांची निवड केली जाईल.

शेतकरी अभ्यासदौ-याकरिता शेतक-यांनी दि. 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तसेच अर्ज केलेले शेतकरी बांधव दि.04 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दुपारी 2.00 वाजता उपस्थित रहावे. प्राप्त अर्जातून जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार आहे. असे जिल्ह्यातील सर्व कृषि बंधु व भगिनींना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, शुक्राचार्य भोसले, यांनी केले आहे.

Previous Post

झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी स्वीकारला पदभार..

Next Post

पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे- उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे- उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026