सोलापूर : कामतकर क्लासेसने दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले असून, शहरातील वेदिका आंधळकर आणि संकेत तगारे या दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
क्लासेसच्या तब्बल ६९ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे, ५ विद्यार्थ्यांना गणितात, ६ विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये आणि एका विद्यार्थिनीला सायन्समध्ये प्रत्येकी १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत. यासोबतच १६ विद्यार्थ्यांनी मराठीत आणि ३१ विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये ९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एका विद्यार्थिनीने इतिहास-भूगोलमध्येही १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
तसेच शहरातील विविध शाळांमध्ये कामतकर क्लासेसचे वेदिका आंधळकर, संकेत तगारे, गायत्री लोखंडे, तन्मय घाडगे, ओजस हुमनाबादकर, हर्षवर्धन लामकाने आणि मुग्धा महाबळ यांनी प्रथम क्रमांक पटकावले आहेत.
२००४ पासून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट निकाल देणाऱ्या कामतकर क्लासेसच्या या यशाबद्दल सुनील कामतकर, सुखदा कामतकर आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.