• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन करणार नाही – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2025
in इतर घडामोडी
0
पंढरपूर कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन करणार नाही – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
2
VIEWS

पंढरपूर : येथील प्रस्तावित कॉरीडॉरसाठी कोणाचेही जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही.दोन दिवस बाधितांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे समजून घेतले. त्यांच्या शंकेचे निरसन केले. शनिवारी म्हणजे आज वाराणसी येथील एक पथक येथे पाहणी करणार आहे. तसेच या सर्व बाधितांचा सामाजिक – आर्थिक निकषावर सर्व्हे केला जाणार असून त्या नंतर पुन्हा सर्वांशी संवाद साधणार असे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी माहिती दिली. दोन दिवसांचा संवाद सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी असते. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील चौफाळा ते महाद्वार घाट या दरम्यान कॉरीडॉर करण्याचे नियोजन सुरु आहे. याला स्थानिकांचा विरोध आहे. मात्र जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी १ व २ मे या दोन दिवशी जवळपास ६०० पेक्षा जास्त बाधितांशी संवाद साधला. या बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वयक संतोष देशमुख, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह मंदिर परिसरातील नागरिक, व्यापारी, विक्रेते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, जर कॉरिडॉर झाला तर नागरिकांना विश्वासात घेऊनच केला जाणार आहे. कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही. मंदिर परिसर भागात बाधित कुटुंबांचा सामाजिक – आर्थिक निकषावर आधारित एक सर्व्हे केला जाणार आहे. या माध्यमातून त्या बाधीताचा आर्थिक स्त्रोत,कौटुंबिक जबादारी व अन्य माहिती एकत्र केली जाणार आहे. त्यावरून किती मोबदला द्यावयाचा या बाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करणार आहे. हा सर्व्हे बुधवारी सुरु करणार आहे. दहा दिवसात सर्व्हेचे काम होईल. पुढील २० दिवसात त्याबाबतचा एक अहवाल तयार करून पुन्हा या सर्वांना बोलवून तयार केलेली माहिती बाधितांना सांगून त्यामधील शंकेचे निरसन करणार असल्याचे आशिर्वाद यांनी सांगितले. वाराणसी येथील एक पथक शनिवारी येथे पाहणी आणि मार्गदर्शन करणार आहे. कॉरिडॉर बाबत कोणत्याही मालमत्ता धारक, विक्रेते, व्यापारी यांचे नुकसान होऊ नये यासाठी नागरी वस्तीत करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या भूसंपादनाची पाहणी व माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले होते. कॉरिडॉर झाला तर कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याबाबत प्रयत्न करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
येथे १९८२ साली मास्टर प्लॅन करण्यात आला होता. त्यावेळी मंदिर परिसरातील मालमत्ता धारक विक्रेते व्यापारी यांना नुकसान भरपाई अथवा पर्यायी जागा मिळाली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. या साठी स्वतंत्र एक समिती स्थापन करून योग्य त्या कागदपत्रांच्या आधारावर नागरिकांच्या प्रश्नां बाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाईल असे सांगितले.

Previous Post

हॉस्पिटलच्या मनमानीला लागणार चाप ; मोबाईल ॲप द्वारे थेट आरोग्य विभागाकडे करता येणार तक्रार

Next Post

लाडक्या बहिणींसाठी सामाजिक खात्याचा निधी वळवला ; मंत्री संजय शिरसाट संतापले

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
लाडक्या बहिणींसाठी सामाजिक खात्याचा निधी वळवला ; मंत्री संजय शिरसाट संतापले

लाडक्या बहिणींसाठी सामाजिक खात्याचा निधी वळवला ; मंत्री संजय शिरसाट संतापले

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निघाला हा आदेश, सिमेंट रस्ते, बांधकामे बंद…!

November 19, 2026
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026