• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

५७ वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५

Yes News Marathi by Yes News Marathi
April 2, 2025
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्राचा दिमाखात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश कोल्हापूर व विदर्भहि उपउपांत्यपूर्व फेरीत

पुरी (ओडिशा), दि. २ एप्रिल – पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी साखळी स्पर्धेतील सर्व सामने जिंकत गटात अव्वल स्थान पटकाविले व अजेय कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि विदर्भच्या संघांनीही पुढील फेरीत स्थान निश्चित केले आहे.

महाराष्ट्र पुरुष संघाची दमदार कामगिरी
साखळी फेरीत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दादरा आणि नगर हवेली संघावर ५४-२० असा एक डाव राखून ३४ गुणांनी विजय मिळवला. यात दादरा हवेलीच्या आक्रमकांना महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला बाद करून गुण मिळविता आला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात प्रतिक वाईकरने (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), अनिकेत चेंडवणकर (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) व ऋषिकेश मुर्चावडे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. निहार दुबळे व रविकिरण केंचे यांनी आपल्या आक्रमणात प्रत्येकी ६ गडी बाद केले.

शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडूस ३३-२४ असे ९ गुण व ४.५९ मि. राखून नमविले. यात मिलींद चवरेकरने आपल्या धारदार आक्रमणात ८ गडी टिपले. शुभम थोरात (२.३० मि. संरक्षण व २ गुण) व प्रतिक वाईकर (१.२०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. तामिळनाडूकडून व्ही. शुभ्रमणी (१ मि. संरक्षण व ६ गुण) याची एकाकी लढत अपुरी पडली.

महाराष्ट्र महिला संघाची विजयी मालिका
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने जम्मू-काश्मीरचा ५३-१० असा एक डाव राखून ४३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जम्मू काश्मीरला खेळाडू बाद करून एकही गुण मिळवू दिला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात सुहानी धोत्रे हिने (२.३० मि. संरक्षण व ६ गुण), संपदा मोरे (२.५० मि. संरक्षण व ३ गुण) मनीष पेडेर (१.४० मि. संरक्षण व ६ गुण) व पायल मोरे (१.४० मि. नाबाद संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबवर ३२-११ असा २१ गुणांनी पराभव केला. प्रियांका इंगळे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), संध्या सुरवसे (३.१५ मि. संरक्षण व ४ गुण) व रेश्मा राठोड (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघाच्या विजयात अष्टपैलू खेळी केली. पंजाबकडून राणी (१.३५ मि. संरक्षण ) व नीता देवी (४ गुण) यांची लढत अपुरी ठरली.

महिलांच्या अन्य एका सामन्यात विदर्भ संघाने मध्य भारतवर ३७-२० असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली.

इतर निकाल:
पुरुष गट: महाराष्ट्र पोलिस वि. मणिपूर ३५-२३, पश्चिम बंगाल वि. अखिल भारतीय पोलिस ३०-१८, आंध्र वि. मेघालय ४५-८, केरळ वि. कर्नाटका पोलिस ४५-१२, दिल्ली वि. मध्य भारत २८-१९

महिला गट: पंजाब वि. तेलंगणा २२-१४, केरळ वि. महाराष्ट्र पोलिस २६-९.

उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने:
असे होणार उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने :
पुरुष : महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र पोलिस, कोल्हापूर विरुद्ध दिल्ली, विदर्भ विरुद्ध केरळ
महिला : महाराष्ट्र विरुद्ध केरळ, कोल्हापूर विरुद्ध राजस्थान, विदर्भ विरुद्ध दिल्ली.

Previous Post

सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी देगाव येथील मल निसारण केंद्राची केली पाहणी

Next Post

चैत्रवारी निमित्त जड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
चैत्रवारी निमित्त जड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल

चैत्रवारी निमित्त जड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026