• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नूतनीकृत दाराशा प्रसुतीगृहाचे ८ मार्च रोजी लोकार्पण…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2025
in इतर घडामोडी
0
नूतनीकृत दाराशा प्रसुतीगृहाचे ८ मार्च रोजी लोकार्पण…
0
SHARES
0
VIEWS

बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या ९५ लाखाच्या निधीतून केले सुसज्ज, चांगल्या सोयी सुविधा केल्या उपलब्ध !

सोलापूर : भारतातील अग्रगण्य रसायन उद्योग बालाजी अमाईन्स संचलित बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपत ९५ लाख रुपये निधीतून नूतनीकरण केलेल्या महापालिकेच्या दाराशा प्रसुतीगृहाचे लोकार्पण शनिवार दि. ८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक एन. राजेश्वर रेड्डी आणि बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डफरीन चौक येथील महापालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाच्या नूतनीकरण केले होते. खाजगी रुग्णालयांप्रमाणे उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्याठिकाणी गरोदर महिलांची प्रसुतीपूर्व आणि नंतर उत्तमप्रकारे देखभाल आणि काळजी घेण्यात येत आहे. त्यानंतर आता गांधीनगर नजीकच्या दाराशा प्रसुतीगृहाचे नूतनीकरण करुन कायापालट केला आहे. दाराशा प्रसुतीगृह हे अत्यंत जीर्ण अवस्थेत होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतात. परंतु याठिकाणच्या पायाभुत सुविधांच्या कमतरतेमुळे कर्मचारी, रुग्ण आणि महिलांची खूप गैरसोय होत होती. त्याअनुषंगाने महापालिकेच्या तात्कालीन आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बालाजी अमाईन्सच्या व्यवस्थापनाकडे दाराशा प्रसुतीगृहाचे नुतनीकरण करण्याची विनंती केली होती. त्यांच्या प्रस्तावानुसार बालाजी अमाईन्स संचलित बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून दाराशा प्रसुतीगृहाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण केले आहे. नूतनीकरणामुळे या प्रसुतीगृहाचे रुपडे पालटले आहे. डफरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहात महापालिका आणि तेथील कर्मचारी स्वच्छता, सुरक्षा, नीटनेटकेपणा, जलद रुग्णसेवा आणि व्यवस्थापन योग्य प्रकारे करत आहेत. त्याचप्रमाणे दाराशा प्रसुतीगृहातील कर्मचारीही उत्तम व्यवस्थापन करतील, अशी अपेक्षा व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी व्यक्त केली.

“दाराशा” मध्ये नूतनीकरणाअंतर्गत केली ही कामे

महापालिकेच्या दाराशा प्रसुतीगृहात संपूर्ण इमारतीची डागडूजी, दुरुस्ती व मजबुतीकरण करणे, नविन विद्युतीकरण, प्लम्बिंग, टाईल्स व फरशीकरण, पी ओ पी, अंतर्गत मांडणी बदलणे, रंगकाम, नविन वैद्यकिय उपकरणे, साहित्य पुरविणे आदी जवळपास ९५ लाखांची कामे याठिकाणी करण्यात आली आहेत, असे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले.

बालाजी अमाईन्सचे सतत सामाजिक कार्यात योगदान

सोलापूर, धाराशिव आणि हैद्राबाद याठिकाणाहून कंपनीचे उत्पादन आणि कामकाज सुरु आहे. सीएसआर ही तर अलीकडील काळातील सरकारने आणलेली संकल्पना आहे. मात्र बालाजी अमाईन्स परिवाराने समाजाप्रती आपण काही देणे लागतो ही भावना सुरुवातीपासूनची जपली आहे. बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून सतत सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. कंपनीने यापूर्वी १.२० कोटी रुपये निधीतून रूपाभवानी विद्युत दाहिनी, १.२५ कोटी निधीतून महापालिकेचे डफरीन चौकातील प्रसुतीगृह नूतनीकरण आणि आता ९५ लाख रुपये निधीतून दाराशा रुग्णालयाचा कायापालट केला आहे, असे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले.

Previous Post

व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

Next Post

हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवा!

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवा!

हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवा!

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026