• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2025
in इतर घडामोडी
0
व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर, जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 व 11 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आलेले आहे.

इनोव्हेशन्स इन बायोटेक्नॉलॉजी फॉर सस्टेनिबिलीटी या महत्त्वाच्या विषयावर आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमातून अशा संमिश्र स्वरूपात विविध जैवविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विषयांवर मार्गदर्शन चर्चा आणि सादरीकरण होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर योजन विद्यापीठ, सोलापूर चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते व दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळचे अध्यक्ष मा. राजशेखर शिवदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सिंबायोसिस संस्थेचे कुलसचिव मा. डॉ. एम. एस. शेजुळ हे बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्था व विद्यापीठांमधून तज्ञ संशोधक या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेत पुत्रा युनिर्व्हिसिटी, मलेशिया येथील डॉ. मरिपातुलबक अब्दुल रझाक, डॉ. नूर फतेह मोहम्मद युसुफ, ऑस्ट्रेलिया येथील फिजीओथेरेपिस्ट डॉ. सीन गोल्डबर्ग, एन. आर.सी.पी. सोलापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंजुनाथ, आय. ए. आर. आय. नवी दिल्ली येथील वरिष्ठ शास्तज्ञ डॉ. राघवेंद्र, सी. एस. आर. आय. नीरी, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देवश्री खान, आय.सी.ए.आर. एन.बी.पी.जी.आर. नवी दिल्ली येथील डॉ. गौथमी, मिस्टर बायोलॉजिस्ट, गुवाहाटी, आसाम येथील डॉ. प्रियांका पन्ही इत्यादी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवसीय परिषदे दरम्यान मार्गदर्शन सत्रे, संशोधकांशी थेट संवाद, प्रकल्प सादरीकरण स्पर्धा, सायंटिफिक पोस्टर स्पर्धा अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर जिल्ह्यात जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या परिषदेच्या माध्यमातून व्ही. जी. शिवदारे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय समाजाच्या शाश्वत विकासासाठी आणि विज्ञानाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत आहे. २००५ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि संशोधनात्मक कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. महाविद्यालयाने जैवतंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्ह्यातील पहिले जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू करणारे महाविद्यालय बनले आहे.

व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयाने 2022 मध्ये जैवतंत्रज्ञान विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेतील सादरीकरणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांनी संशोधक, विद्यार्थी आणि उद्योग प्रतिनिधींमध्ये उत्साह निर्माण केला होता. त्यामुळे महाविद्यालयाच्या संशोधन क्षमतेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. या परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक क्षमतेचे प्रतीक आहे, जे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीस हातभार लावत आहे.

या परिषदेमध्ये राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरातून, विविध विद्यापीठ, संस्था व महाविद्यालयांमधून विद्यार्थी आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे घेतलेल्या मार्गदर्शन व चर्चासत्रांचे युट्युब च्या माध्यमातून प्रसारण करण्यात येणार आहे. सर्व स्तरातील विद्यार्थी, संशोधक आणि विज्ञानप्रेमींनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. या प्रसंगी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे विश्वस्त भीमाशंकर शेटे, व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. सुत्रावे, संयोजिका प्रा. गोपिका मंजुनाथ, सहसंयोजक प्रा. डॉ. अनमोल वळसंगे, समन्वयक प्रा. डॉ. ऋषिकेश धनवे, प्रा. लक्ष्मीपुत्र गोटे हे उपस्थित होते.

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शन

Next Post

नूतनीकृत दाराशा प्रसुतीगृहाचे ८ मार्च रोजी लोकार्पण…

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
नूतनीकृत दाराशा प्रसुतीगृहाचे ८ मार्च रोजी लोकार्पण…

नूतनीकृत दाराशा प्रसुतीगृहाचे ८ मार्च रोजी लोकार्पण...

ताज्या बातम्या

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026