सोलापूर : महाराष्ट्र कोळी महासंघाचे शहर अध्यक्ष तथा इंद्रधनु गृह प्रकल्पाचे संचालक गणेश कोळी यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. इंद्रधनु च्या गार्डनवर सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. गणेश कोळी मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.




यावेळी समृद्धी इन्शुरन्स सेल्स सर्विसचे विमा सल्लागार व कार्पोरेट क्लब मेंबर शर्मिला निचळ, सज्जन निचळ, विजय चिप्पा, विक्रांत कदम, लक्ष्मीकांत सरगम, सचिन पवार, बालाजी जमादार, नागेश बिराजदार, निलेश भाऊ कोळी, सतीश दरेकर,अंकुश कुंभार, अनिल जगताप व श्री स्वामी समर्थ शासकीय व जिल्हा परिषद शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरचे पदाधिकारी तसेच विक्रम देशमुख, विनय आपटे, सारंग आपटे, उमेश थोबी, चेतन नरोटे, विक्रम भैया शिरसाट, पंढरपूर, बापू जगदे, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी, अशोक निम्बर्गी, अशोक चौक येथील सुखकर्ता मित्रमंडळाचे पदाधिकारी, विजापूर रोड येथील ओम गर्जना गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच सुखकर्ता ग्रुपचे संचालक पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











