महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा अभय सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.’आयआयटी बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आले आहे. जयपूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई ही केली. बाबाने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला होता की, मी आत्महत्या करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान पोलिस पथकाने त्याच्याकडून गांजाही जप्त केला. अशा परिस्थितीत त्याच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











