• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2025
in इतर घडामोडी
0
मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर
0
SHARES
0
VIEWS

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन
साहित्यिक डॉ. शिवाजी शिंदे, धर्मशाळे, मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे यांच्याकडून कवितांचे सादरीकरण
अप्पर जिल्हाधिकारी यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गझल गायन केले

सोलापूर, दिनांक 28 ( जिमाका):- राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. शासनाने सर्व शासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तरी सर्व शासकीय विभागाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही जाणीवपूर्वक जास्तीत जास्त व्यवहार मराठी भाषेत करावेत व भाषा संवर्धनात पुढाकार घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी केले.

नियोजन भवन सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी अंजली मरोड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, साहित्यिक मारुती कटकधोंड, चंद्रकांत धर्मशाळे, गिरीश दुनाखे, तहसीलदार श्रीकांत पाटील, समीर यादव यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व साहित्यिक उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर पुढे म्हणाले की, आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढवावा. प्रशासन ही मराठी भाषेचा वापर करत आहे. मराठी भाषा वापरत असताना भाषेची शुद्धता ही महत्त्वाची आहे, त्यावरही सर्वांनी जाणीवपूर्वक काम करावे. केंद्र शासनाने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे सर्व मराठी भाषिक नागरिकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून आपल्या भाषेचा जास्तीत जास्त वापर करून भाषा मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होईल तसेच मराठीत साहित्य कृती निर्माण होतील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले की, प्रत्येक कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. शासकीय कार्यालयात मोबाईलच्या अतिवापरामुळे कर्मचाऱ्यांचा परस्परातील संवाद अत्यंत कमी झालेला आहे तरी सर्वांनी परस्परात योग्य संवाद ठेवावा तसेच तो संवाद मराठी भाषेतच करावा असेही त्यांनी सुचित केले.

हत्तरसंग कुडल या गावाला पुस्तकाचे गाव ही योजना जाहीर झाली. तसेच मोडनिंब येथे कैलास काटकर यांचे केस कर्तनालय आहे, तेथे त्यांच्या दुकानात जवळजवळ 350 पुस्तके आहेत आणि दररोज 70 ते 80 लोक तेथे येऊन पुस्तके वाचतात. तेथील पुस्तके वाचणाऱ्या लोकांना विशेष सवलत ते देतात. यातून मराठी भाषेचे संवर्धन होण्यात मोलाची भूमिका बजावली जात आहे असेच उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी झाल्यास मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

काव्यवाचन-
डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी माणसे ही कविता सादर केली.
“का अशी माणसाशी वागतात माणसे
आपल्याच माणसांना छळतात माणसे
किरकोळ कारणांनी पेटतात माणसे
का अशी माणसाशी वागतात माणसे
कामापुरतीच गोड बोलतात माणसे
का अशी माणसाशी वागतात माणसे”
या कवितेतून कवीने सध्या माणसा माणसात कशा पद्धतीचे वागणे वर्तणूक आहे याचे अत्यंत स्पष्टपणे वर्णन केलेले आहे.

त्यानंतर कवी चंद्रकांत धर्मशाळे यांनी माझी मायबोली जगात महान, मारुती कटकधोंड यांनी काळ गिरीश दुनाखे यांनी देवभट ही कविता सादर केली.
तसेच अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” व “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत गायले.

जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी प्रास्ताविक केले व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम आयोजनाच्या उद्देश सांगितला तसेच या कार्यक्रमात कवींना आमंत्रित केलेल्या असून काव्य वाचनाचा कार्यक्रमही होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी अंजली मुरोड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Previous Post

सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात युवा पँथर आक्रमक

Next Post

राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण…

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण…

राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण…

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026