सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरच्या गड्डा यात्रेनिमित्य आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गड्डा फिरवुन आणण्यात आले.
खर तर समाजाच्या हया उपेक्षित दुर्लक्षीत वर्गातून अश्या गरंजुपर्यंत आस्थाच्या वतीने सक्रिय कार्य केले जात आहे.
सिध्दरामेश्वरच्या या यात्रेत विविध प्रकारचे पाळणे,खेळणे तसेच खादय पदार्थ येतात
ज्याची ही मुल आतुरतेने वाट बघत असतात.
समाजातील काही घटक असा ही आहे की दोनवेळेच जेवणासाठीही संर्घष करावा लागतो.
वाढती महागाई व तुटपुंजी कमाई हयांचा मेळ बसवणे तस हया घटकांसाठी तारेवरची कसरत च अश्या पाल्यांच्या मुले सारख्या अनाथ अश्राममध्ये शिक्षणाकरिता आहेत परंतु गड्यावर साधी एक फेरफटका देखील मारला तर किमान खिश्याला न परवडणारी बाब परंतु ही गरज आस्था रोटी बँकेच्या सर्वेसर्वा विजय छंचुरे यांच्या लक्षात येता गेल्या काही वर्षांपासून ही गड्डा सहल घेण्यात येते.
हयामध्ये हया अनाथ व गरजू मुला मुलींनी
मिकी माऊस जंपिंग,
बोटिंग,टाॕय ट्रेन ,ड्रागन राईड, ब्रेक डान्स, बाबा गाडी,
उंच पाळणे व मनोसोक्त खरेदी व तदनंतर कचोरी, भेळ पाणीपुरी, बटाटा वडा व सुगंधी दुध घेऊन मनमुराद आनंद लुटला. व अनाथ मुलांना व मुलींना बांगड्या, बॅडमिंटन, फुगे, घड्याळ इत्यादी साहित्य देण्यात आले
गड्यावरुन परत येताना सर्व मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू ,आनंद होता हा शब्दात मांडणे कठीण.
दोन आश्रमातील प्रार्थना अनाथ आश्रम, मातोश्री अनाथ मुलींची आश्रम या दोन्ही ठिकाणचे मुलं व मुलींना गड्डा फिरून आणण्यात आले आहे.
आस्था रोटी बँक नेहमीच अशा अनाथ मुलांना मदत करत असते.
हया आस्थाच्या स्तुत्य उपक्रमात सहभाग दिला
विजय छंचुरे, कांचन हिरेमठ, स्नेहा वनकद्रे, स्नेहा मेहता, अनिता तालिकोटी, संगीता छंचुरे, अविनाश माचारला, या सर्वांनी सहभाग नोंदवले होते.अनाथ मुला मुलींना जात्रा सहल व मनोसोक्त खरेदी व भटकंती चा मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे करण्यात आल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आल.