• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
0
VIEWS
                                       

*पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

*जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

*सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार

*जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या
प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार

सोलापूर- विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात चौफेर प्रगती करत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.


भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.


पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारुन ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली, त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल योगदान लाभलं. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा करतो.


सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 लाख 20 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 10 लाख 55 हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजी पर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत 6 हजार 144 लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका 5 हजार रुपये प्रमाणे 3 कोटी 7 लाख 20 हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.


सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण 282.75 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. परंतु भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे दर्शन मंडप व दर्शन रांग याकरिता 129.40 कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरिता 73.85 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून या अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.


सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसात उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच केंद्र व राज्य शासन बेघरांना स्वतःचे घरकुलाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य सर्व आवास योजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2024-25 आर्थिक वर्षात 702 कोटी निधी मंजूर आहे. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली आहेत. बेटी बचाओं बेटी पढ़ाओ ही योजना राबविण्यात येते. या योजनेला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात दिनांक 22 जानेवारी 2025 ते 08 मार्च 2025 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करावे, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले.


जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून संपूर्ण जिल्हा पाणीदार करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी देऊन कृषी क्षेत्रातील कृषी विषयक माहिती आणि डिजिटल सेवा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुचित केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे. प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसून प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री गोरे यांनी केले.


पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा वी. एस. यांचे समवेत परेड संचलन केले. त्यानंतर पतसंचलन झाले. यावेळी भारतीय उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच पालकमंत्री महोदय यांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू विरोधी दिन व कुष्ठरोग मुक्त भारत बाबत शपथ दिली. त्यानंतर पोलीस विभाग, कृषी विभाग, सैनिक कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, क्रीडा विभागाचे पुरस्कार वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.


या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, ज्येष्ठ नागरिक अन्य मान्यवर नागरिक यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Previous Post

डॉ मनोज देवकर यांना 2025 चा प्रजासत्ताक दिनाचा पर्यावरण दूत पुरस्कार

Next Post

सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!

सिईओ कुलदिप जंगम यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण ..!

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026