• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांची घोषणा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 25, 2024
in इतर घडामोडी
0
बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांची घोषणा
0
SHARES
1
VIEWS

प्रथम महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचा होणार नागरी सन्मान

सोलापूर : विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींना बसव ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी (दि. २८) सकाळी १०.३० वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे. या पुरस्कारांची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे आणि पदाधिकाऱ्यांनी
याबाबत माहिती दिली.

या पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्यावतीने होणार आहे. पुरस्कार समितीच्या स्वागताध्यक्षपदी
उद्योजक ॲड. सोमेश वैद्य, तर कार्याध्यक्षपदी सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, फेटा आणि मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्यावर्षी डॉ. अमरनाथ सोलापूरे (बीदर, कर्नाटक) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ ॲड. विश्वनाथ पाटील, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे, अध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार (लातूर ), उद्योजक मल्लिनाथ अक्कळवाडे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शशिकांत पुदे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉ. प्रतिभा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.

बसव ब्रिगेड शहर व जिल्हा शाखेतर्फे समस्त सोलापूरकरांच्यावतीने वीरशैव कक्कय्या ढोर समाजातील प्रथम महिला खासदार झाल्याबद्दल प्रणिती शिंदे यांचा नागरी सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट, सुजाता शास्त्री, डॉ. वैजिनाथ कुंभार, शाम धुरी, विनायक साळुंखे, मकबुल मुल्ला, नीता स्वामी, संपन्न दिवाकर यांचा विशेष सत्कार याप्रसंगी होणार आहे.

या पत्रकार परिषदेस बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे, बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर सहसचिव अविनाश बिराजदार, धाराशिव कार्याध्यक्ष पंडित जळकोटे, ॲड. विनयकुमार कटारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव, प्रसिध्दी प्रमुख दत्ता केरे
आदी उपस्थित होते.

Tags: AnnouncementBasav BrigadeState Level Basavaratna Awards
Previous Post

धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रामाणिकपणे काम करता आले – जिल्हा सरकारी वकील राजपूत

Next Post

सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन!

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन!

सोलापूर विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेचे आयोजन!

ताज्या बातम्या

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026