मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर येत असून, ठाकरे गटाला एकूण 22 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला होता. अखेर ठाकरे गटाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 22 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने आता उमेदवारांना देखील प्रचारासाठी वेळ मिळायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. ज्यात उद्धव ठाकरेंना 22 जागा मिळणार असल्याचे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मतदारसंघासह उमेदवारांच्या नावाची देखील उद्धव ठाकरेंकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.