सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जनकल्याण मल्टिस्टेटचे चेअरमन व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार राजेंद्र हजारे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड केली . या निवडीचे पत्र त्यांनी राजेंद्र हजारे यांना प्रदान केले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील व कार्यालयीन प्रमुख शिवराज जाधव उपस्थित होते. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.