सोलापूर दि. 3: येथील स्मृती ऑरगॅनिक्स कंपनीने आज कोरोना विषाणू विरुध्दच्या लढाईसाठी दहा लाख रुपयांची मदत दिली. कंपनीचे उपाध्यक्ष रफिक शेख यांनी दहा लाख रुपयांचे धनादेश पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सुपुर्द केले.
स्मृती ऑरगॅनिक्स कंपनीने पाच लाख रुपये पीएम केअर फंडासाठी तर पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिल्याचे कंपनीचे वित्त आणि लेखा अधिकारी विजय चांगले यांनी सांगितले. स्मृती ऑरगॅनिक्स कंपनीचा चिंचोळी औद्योगिक वासहतीमध्ये प्रकल्प आहे. औषधे निर्मितीच्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. इगा पुरुषोत्तम कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.