येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या लग्न सराईची घाई सुरू आहे. मे आणि जून मध्ये मोठ्या प्रमाणात लग्न चे मुहूर्त आहेत. त्यामुळे ग्राहक आत्ताच खरेदीला बाहेर पडत आहेत. सध्याच्या ट्रेंड नुसार ” भरजरी शालू” आणि ब्लाऊज शिवाय ” घागरा ” ला जास्त मागणी असल्याचे मत व्ही. आर. पवार सारीजचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पवार यांनी व्यक्त केले.
सोलापूर चाटी गल्ली येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये ग्राहकांच्या आवडीचे घागरा, शालू आणि आहेराच्या साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेले आहेत. सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.
सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड सह पुणे, मुंबईचे देखील ग्राहक सध्या खरेदीसाठी चाटी गल्ली येथील व्ही. आर. पवार सारीज मध्ये येत असून यात प्रामुख्याने डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर लाचा , डिजाइनर वर्क सारीज, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कांची आणि पैठणीची मोठ्या प्रमाणाने मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
लग्न बस्ता करिता व्ही. आर. पवार सारीजत सर्वोत्तम अशी ओळख असलेल्या व्ही. आर. पवार मध्ये ड्रेस मटेरियल देखील मोठ्या प्रमाणात मिळते. यात प्रामुख्याने कॅज्युअल ड्रेस, पार्टीवेअर, ऑफिशियल ड्रेस, टॉप, लेगिन्स , स्ट्रेट पँट, प्लाझो सेट, रेडी वेअर ड्रेस, स्ट्रीट लॉंग, वन पीस अशा विविध ड्रेसची मालिका ग्राहकांकरिता उपलब्ध आहे.
घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग सुरू आहे. व्यापाऱ्यांना खरेदीसाठी प्रायव्हसी मिळते. त्यामुळे सोलापूर शहर परिसरातील छोटे , मोठे व्यापारी व लग्न बस्ता ग्राहकांना, विनंती की त्यांनी एक वेळ व्ही. आर. पवार सारीजला अवश्य भेट द्यावे. असे आवाहन अमर पवार, महेश पवार, आणि गिरीश पवार यांनी केले आहे.