• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्योगांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध – उद्योगमंत्री उदय सामंत

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2023
in इतर घडामोडी
0
उद्योगांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध – उद्योगमंत्री उदय सामंत
0
SHARES
0
VIEWS

जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे जाणून घेतल्या समस्या

  • सोलापूर : औद्योगिक प्रगती झाली तर रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्माण झाला तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. यातूनच देशाची प्रगती होईल. त्यामुळे उद्योजक आणि उद्योगांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा करून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजे, महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. के. सांगळे, सोलापूर एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे राजू राठी, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता, एस आर गावडे, कार्यकारी अभियंता एस एस गांधीले, भरत शहा यांच्यासह औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
  • उद्योजकांना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. तसेच, एमआयडीसीचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावेत. तसेच कुशल कामगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्राला जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. चिंचोली एमआयडीसीमध्ये इमारत तयार आहे. आयटीसाठी ही इमारत दिली जाऊ शकते. त्यातील अडथळे दूर करून त्यावर मार्ग काढावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
  • उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, सोलापूरला अधिकाधिक उद्योग यावेत, तसेच सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. होटगी विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाईल. यावेळी दावोस परिषदेमधून महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आणली, यासाठी ना. सामंत यांचे उद्योजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
  • सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढल्याने सोलापुरात नवीन औद्योगिक क्षेत्र होणे गरजेचे आहे. उद्योजकांना उद्योग निर्मितीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. तसेच जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी बैठकीत सांगितले. सुरत चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडोर असल्याने विविध ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • सोलापूरच्या विविध औद्योगिक संघटनांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. यामध्ये सोलापूरच्या वस्त्रोद्योग व विडी उद्योगासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्ये विकास केंद्राची मागणी, ट्रक टर्मिनल्स उभारणे, विना वापर पडून असणाऱ्या औद्योगिक जागांचा वापर करणे तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सुरळीत पाणीपुरवठा करणे, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या हद्दीतील साफसफाई, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना जागा उपलब्ध करून देणे आदिंबाबत चर्चा झाली. महापालिका हद्दीत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात सोलापूर महापालिकेने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना ना. सामंत यांनी यावेळी केल्या.
  • तसेच, औद्योगिक वसाहतीमध्ये पथदिव्यांची समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, फायर स्टेशन, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे ट्रीटेड वॉटर, अग्निशमन केंद्राची उभारणी, सिटी बस सेवा, ग्रामपंचायत करआकारणी, स्टँप ड्युटी आणि ट्रान्सफर आदि बाबींवर चर्चा करण्यात आली.
Previous Post

रकुल प्रीत सिंग लेटेस्ट अनारकली ड्रेस एथेनिक लुक!

Next Post

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्राप्त पात्र कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत – उद्योगमंत्री उदय सामंत

Related Posts

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इतर घडामोडी

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 2, 2026
वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
Next Post
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्राप्त पात्र कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत – उद्योगमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत प्राप्त पात्र कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत - उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

June 3, 2026
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

June 3, 2026
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026