दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ठीक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, हेमंत निकम, सोपान टोणपे, सुमित शिंदे, भारत वाघमारे आदिंसह सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी शंभरकर व इतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले.