• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात 24 ते 30 जानेवारी दरम्यान होणार इलेक्ट्रो 2023 प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2023
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
सोलापुरात 24 ते 30 जानेवारी दरम्यान होणार इलेक्ट्रो 2023 प्रदर्शन
0
SHARES
1
VIEWS

“इलेक्ट्रो २०२३” प्रदर्शन २४ ते ३० जानेवारी दरम्यान सोलापूर महापालिकेच्या विष्णू मिल कंपाउंडच्या नव्याने निर्मित एक्झिबिशन ग्राऊंडवर होणार : यंदा मंडपाचा एक भाग वातानुकुलीत असणार

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस्चे भव्य “इलेक्ट्रो २०२३” चे प्रदर्शन २४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील निर्मित आठ एकरच्या एक्झिबिशन ग्राऊंडवर आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष ईश्वर मालू यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा इलक्ट्रो प्रदर्शनाचे मेटझ हे मुख्य प्रायोजक असून केल्व्हीनेटर, सिस्का एलईडी, बीपीएल हे सह प्रायोजक आहेत. बजाज फायनान्स हे फायनान्स असोसिएट आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार २४ जानेवारी रोजी सायं. ५.०० एस. विजय असि जनरल मॅनेजर, मेटझ इंडिया प्रा. लि. यांच्या हस्ते व मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे इलेक्ट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी सांगितले. ७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२३ या प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पहात असतात. दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स. ११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टिव्ही, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच बजाज फायनान्स व इतर फायनान्स च्या माध्यमातून शुन्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.

सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२० ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. कोव्हीडमुळे दोन वर्षे हे प्रदर्शनाचे आयोजन भव्य प्रमाणावर केले गेले नसल्यामुळे यावर्षी आयोजक, सहभागी व ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सुमारे ३५० स्टॉल्स् असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे सुमारे ३०% स्टॉल्स् हे विशेषरित्या निर्मित वातानुकुलीत दालनात असणार आहे.या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय. तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे.
सर्व स्टॉल मध्ये जवळपास ४०० विविध पदवीधर विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनासाठी सेडाद्वारे विविध समित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण आणि सुविधा असणार आहे. स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोई उपलब्ध करण्यात येणार असुन यामध्ये खवय्या साठी फुड कोर्ट इ. सोयी असणार आहेत. धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदान वर मॅटींग ची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असुन त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष सोय करण्यात आली आहे. प्रेक्षक आणि स्टॉल धारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्डस ही नेमण्यात आले आहेत. सेडा तर्फे प्रदर्शन दरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे. प्रर्दशनासाठी प्रशस्त पार्किंगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर ची व्यवस्था करण्यात आली आहे.
सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात. या प्रदर्शनातही ४ स्टॉल्स् सामाजिक संस्थांना उपलब्ध करुन दिले असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परीषदेस सेडाचे उपाध्यक्ष डॉ. सूरजरतन धुत, सचिव आनंद येमुल, सह सचिव सुर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भूषण भूतडा व संचालक सर्वश्री सुयोग कालाणी गिरीष मुंदडा, विजय टेके, हरीष कुकरेजा, संदेश कोठारी व सुनिल भांजे तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, सतिश मालू, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दिपक मुनोत, समीर गांधी, विपीन कुलकर्णी, जितेंद्र राठी, कौशिक शाह, खुशाल देढीया संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.
================

यंदाचे खास आकर्षण

३५० स्टॉल्स्पैकी काही स्टॉल्स् हे विशेषरित्या निर्मित वातानुकुलीत मंडपात असणार आहे. सोलापूरात अशाप्रकारचे एसी टेन्ट प्रदर्शनात इलेक्ट्रोमध्ये दुसऱ्यांदा सादर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमाची राज्यस्तर दखल – आयुक्त मांडरे

Next Post

रोटरी सोलापूर इलाईट तर्फे व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
रोटरी सोलापूर इलाईट तर्फे व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान

रोटरी सोलापूर इलाईट तर्फे व्यवसाय सेवा पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026