• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून, सोलापूर जिल्ह्याची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू. जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, महिला बचत गट अशा सर्वच क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि ओमराजे निंबाळकर, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे, यशवंत माने, प्रणिती शिंदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, यांच्यासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल उगले, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे आदिंसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा. विकासात्मक भूमिका घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2022-23 मध्ये खर्चाच्या टक्केवारीच्या बाबतीत जिल्हा नियोजन समिती राज्यात अग्रेसर आहे. मात्र, स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निधी खर्च होण्यास अत्यल्प वेळ मिळणार आहे. तरी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी चालू वित्तीय वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहित वेळेत खर्च करण्यास प्राधान्य द्यावे. 100 टक्के निधी मार्च 2023 पूर्वी खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 करिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी रू. 502.95 कोटी रुपये,, अनुसूचित जाती उपयोजनासाठी रू. 151 कोटी रुपये आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनासाठी रू. 4.28 कोटी असा एकूण 658.23 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रारूप आराखड्यास राज्यस्तरीय समितीसमोर सादर करण्यास समितीने मान्यता दिली. तसेच, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादर करण्याच्या अनुषंगाने 166 कोटी रुपयांच्या अतिरीक्त मागण्यांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये आणखी निधी वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग होण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क होण्याच्या दृष्टीने पावले उचलू. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून, तसेच, प्राचार्य, उद्योजक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, अशा पद्धतीने नियोजन करावे, असे ते म्हणाले.

विकासाचे निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन घ्यावेत, तसेच, खातेप्रमुखांनी कोणत्याही दबावाखाली काम करू नये. चांगले व पारदर्शकतेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आपण नेहमीच पाठीशी राहू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली. जलजीवन मिशनची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका. ज्यांच्याकडून दोन कामे अपूर्ण असतील, त्यांना पुढील कामे देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू. जिल्हा परिषद शाळा बीओटी तत्त्वावर देण्याचा मनोदय व्यक्त करून ज्या जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहेत, त्यांचे महानगरपालिकेने सक्षमीकरण करावे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, जी 20 देशातील उद्या पुण्यात येणाऱ्या शिष्टमंडळास सोलापुरी चादर व टॉवेल देणार असल्याचे सांगून 22 देशांतील सदस्यांपर्यंत या माध्यमातून सोलापूरच्या उत्पादनांचे ब्रँडिंग होईल, असे ते म्हणाले.

या बैठकीत 04 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास तसेच बैठकीचे इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाही अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. सन 2022-2023 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांच्या 31 डिसेंबर 2022 अखेरील खर्चाचा यंत्रणानिहाय व योजनानिहाय आढावा घेण्यात आला.

प्रारंभी जिल्हा नियोजन समितीवर नवनियुक्त सदस्यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुंडलिक गोडसे यांनी सादरीकरण केले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मते मांडली. बैठकीस विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख,नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Previous Post

विशेष श्रमसंस्कार शिबिराचे गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान – जितेंद्र बाबा साठे

Next Post

बीबीदारफळ जिल्हा परिषद शाळेतील एकाच वर्गातील तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
बीबीदारफळ जिल्हा परिषद शाळेतील एकाच वर्गातील तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

बीबीदारफळ जिल्हा परिषद शाळेतील एकाच वर्गातील तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026