• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ.विजयकुमार देशमुख यांना यापुढे भाजपकडून तिकीट तरी मिळते का ?

Yes News Marathi by Yes News Marathi
January 6, 2023
in मुख्य बातमी
0
आ.विजयकुमार देशमुख यांना यापुढे भाजपकडून तिकीट तरी मिळते का ?
0
SHARES
1
VIEWS

धर्मराज काडादी यांनी दिले खुले आव्हान

येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपला ढाल करण्याचा आ . विजयकुमार देशमुख यांचा केविलवाणा प्रयत्न धर्मराज काडादी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडचणीबाबत मी कधीच कोणत्याच पक्षाला दोष दिलेला नाही . तसेच कुणावर टीकाही केलेली नाही . मुळात कारखान्याची चिमणी बांधकाम परवाना घेऊनच बांधली आहे . त्यामुळे चिमणी बेकायदेशीर असूच शकत नाही . सदर परवाना कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असताना देण्यात आला आहे . म.न.पा.ने त्यात काही तांत्रिक अटी घातल्या आहेत . त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करत आहे .

हा प्रश्न सोडविण्यासाठी १ ९ डिसेंबर २०२२ रोजी कारखान्याचे सभासद शेतकरी कर्मचारी आणि नागरिकांनी चिमणीच्या बचावासाठी हजारोंच्या समुदायाने काढलेला मोर्चा आणि विराट सभा पाहून तसेच आणि सदरच्या सभेत भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे मार्गदर्शन तसेच माजी शहराध्यक्ष प्रा . अशोक निंबर्गी , नगरसेवक सुरेश पाटील , सुभाष शेजवाळ यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सामील झाले . तसेच माजी आमदार कॉ . नरसय्या आडम , माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे , माजी आमदार दिलीप माने , विश्वनाथ चाकोते , शिवशरण पाटील बिराजदार , महादेव चाकोते , राजशेखर शिवदारे , बळीरामकाका साठे , दक्षिणचे नेते बाळासाहेब शेळके , माजी महापौर महेश कोठे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव , काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे , शिवसेना शिंदे गटाचे मनीष काळजे , शिवसेना ठाकरे गटाचे गणेश वानकर , सुरेश हसापुरे , शेतकरी संघटनेचे अमोल हिप्परगी , शिवानंद दरेकर , जाफरताज पटेल , अख्तरताज पटेल हे सर्व विविध पक्षाचे नेते कारखान्याच्या बाजूने आपली भूमिका मांडून झारीतील शुक्राचार्य शोधून काढा , त्याला उघडे पाडून त्याचे बंदोबस्त करू , असे आवाहन केले . या सर्व नेत्यांची भूमिका आणि सूर पाहाता आ . विजयकुमार देशमुख यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली आहे . कोणताही पक्ष चिमणीच्या आड नसून फक्त विजयकुमार देशमुख हेच चिमणीच्या आड आहेत हे शेतकरी , कर्मचारी व नागरिक यांच्या लक्षात आले असून मोर्चानंतरच्या सभेत माझ्यासह अनेक वक्त्यांनी नाव न घेता त्यांना इशारा दिला . त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन विजयकुमार देशमुख यांनी माझ्यावर आणि सिध्देश्वर परिवारावर टीका करण्यास सुरुवात केली आहे . त्यांच्यावरील टीकेचा खुलासा करताना चुका काडादींनी केल्या आहेत . परंतु त्याचे खापर भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि खासदारांवर का फोडता ? असा सवाल करून तुमचे प्रश्न शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडूनच सोडवून घ्या , असे अपरिपक्व विधान विजयकुमार देशमुख यांनी केले आहे . वास्तविक पाहता २०१४ पासून चिमणीच्या अडचणीचा विषय जसा निर्माण झाला तेव्हापासून राष्ट्रीय नेते श्री . शरद पवार साहेब सिध्देश्वर परिवाराच्या पाठीशी आणि मदतीसाठी खंबीरपणे उभे आहेत . हीच भूमिका माजी गृहमंत्री श्री . सुशीलकुमार शिंदे , विद्यमान मुख्यमंत्री श्री . एकनाथ शिंदे यांचीदेखील आहे . त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन नागरी हवाई उड्डाण मंत्री श्री . जयवंत सिन्हा , विद्यमान या खात्याचे मंत्री श्री ज्योतिरादित्य शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , माजी खासदार प्रभाकर कोरे , माजी खासदार अमर साबळे , आ . रणजितसिंह मोहिते पाटील यांनीदेखील सहकार्य केले आहे . यदाचा ५० वा गळीत हंगाम भाजपचे आमदार श्री . सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . तसेच माजीमंत्री आ . सुभाष देशमुख यांनी बोरामणी विमानतळ विकासास वनखात्याचा येणारा अडथळा दूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे . भाजपचे विद्यमान खा . डॉ . श्री . जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी लोकसभेमध्ये १ ९ आसनी विमानसेवेची उड्डाण योजनेतून होटगी रोड विमानतळावरून सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली आहे . तसेच बोरामणी विमानतळाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी श्री . ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे . विद्यमान पालकमंत्री श्री . राधाकृष्ण विखे – पाटील यांनी पहिल्याच दौऱ्यात कारखान्याच्या चिमणीला पक्का न लावता विमानसेवा सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला . भाजपच्या या सर्व नेत्यांनी कारखान्याच्या बाजूनेच भूमिका घेतली आहे . त्यामुळे मी भाजपवर आरोप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . विजय देशमुख यांचा आरोप बिनबुडाचा आहे . फक्त भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांवर मी टीका करीत आहे , ही विजय देशमुख यांची टीका दिशाभूल करणारी आणि हास्यास्पद आहे . कारण चिमणीला अडथळा आणण्यामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे . कारण तथाकथित सोलापूर विकास मंचला पत्राद्वारे पाठिंबा देणे , त्यांच्या आंदोलनाला आतून मदत करणे जशी २०१४ पासून म.न.पा. मध्ये भाजपची सत्ता आली . तेव्हापासून सर्व बांधकाम परवान्याच्या अटींवरून वारंवार नोटिसा देणे , कारखान्याचे सांस्कृतिक भवन , संगमेश्वर महाविद्यालयाचे बांधकाम , श्री सिध्देश्वर देवस्थानच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा बांधकाम असे सर्व प्रकारचे बांधकाम परवाने अडवून ठेवणे , साखर कारखान्याचे अनेक प्रस्ताव प्रलंबित ठेवणे अशा सर्व अडवणुका म.न.पा.च्या सत्तेच्या माध्यमातून अडथळे आणण्याचे काम विजयकुमार देशमुख यांचेच आहे . त्याचबरोबर २०१६ मध्ये श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या वेळेस होम मैदानाच्या रस्त्याच्या भागाचा वापर करण्यास जिल्हा प्रशासनाच्या मनाईचा प्रश्नदेखील विजय देशमुख यांनीच निर्माण केला . मंत्री झाल्यापासून कारखान्यासोबतच श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेस वेगवेगळे अडथळे निर्माण करणे , सिध्देश्वर परिवाराची कोणतीही विधायक कामे सुरळीत पार पडू नये यासाठी विजयकुमार देशमुख अत्यंत द्वेषाने प्रयत्नशील राहिले आहेत .. भाजपमध्ये कोणाच्याही सांगण्यावरून मंत्रीपद दिले जात नाही हे विजयकुमार देशमुख यांचे विधान हास्यास्पद आहे . २०१४ मध्ये माझे व्याही आणि कर्नाटकचे मंत्री व्ही . सोमण्णा यांना तत्कालीन केंद्रीय मंत्री स्व . अनंतकुमार यांनी विजयकुमार देशमुख यांना मंत्री करण्याबाबत विचारणा केली . तेव्हा समाजातील शांत आणि सुस्वभावी नेतृत्व असल्याने मंत्री करण्यास हरकत नाही असे मी सांगितलं आणि माझ्या व्याहींच्या सूचनेनुसार अनंतकुमार यांना संपर्क साधण्यासाठी सांगितले . त्यामुळे त्यांना २०१४ मध्ये मंत्रीपद मिळाले . स्व . अनंतकुमार आणि माझे व्याही यांचा यामध्ये मोलाचा सहभाग आहे , हे विजयकुमार देशमुख मान्य करीत नाहीत . कारण मुळातच संकुचित वृत्ती असलेल्या विजय देशमुखांकडून मनाच्या मोठेपणाची अपेक्षा करणे चुकीचे आहे . राहाता राहिले राजकीय निवडणुकीच्या खुल्या मैदानात उतरण्याचे त्यांचे आव्हान मी तर १ ९९ ६ पासून कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सिध्देश्वर पॅनलच्या माध्यमातून विजयकुमार देशमुख यांनाच पराभूत करून धूळ चारली आहे आणि माझी विश्वासार्हता सिध्द केली आहे . त्यामध्ये त्यांच्या संपूर्ण पॅनलचे डिपॉझिटदेखील जप्त झाले आहे . परंतु २००१ ते २०११ पर्यंत त्यांना मोठ्या मनाने माझ्या पॅनलमध्ये घेऊन कारखान्याचे संचालक केले आहे . तसेच त्यांचे बंधू बसवराज देशमुख यांना २०१६ ते २०२१ कारखान्याचे संचालक म्हणून संधी दिली हे त्यांनी सोयीने विसरले आहेत . यापुढे जशी राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल आणि मी आजही मैदानातच आहे . आतापासूनच विजयकुमार देशमुख यांनी स्वतःची राजकीय विश्वासार्हता टिकविण्यासाठी धडपड करावी , असे माझे विजयकुमार देशमुख यांना आव्हान आहे . भाजपसह सर्वच पक्षाच्या नेत्यांची कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका पाहता , विजयकुमार देशमुख यांची कारखान्याविरुद्धची भूमिका उघड झाल्यामुळे ते एकटे पडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी चिमणीच्या विषयात भारतीय जनता पार्टीला पुढे करून त्याचे कवच म्हणून वापर करीत आहेत . यातूनच भाजपची आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . कारण एकट्याने लढणे त्यांना शक्य नाही , हे त्यांच्या लक्षात आले आहे . अशीच त्यांची भूमिका राहिल्यास श्री सिध्देश्वर परिवार त्यांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही . ज्या श्री सिध्देश्वर परिवाराच्या जीवावर त्यांना राजकीय स्थान मिळाले त्याच संस्थांच्या जीवावर उठण्याचे घाणेरडे कृत्य विजयकुमार देशमुख यांनी केले आहे . श्री सिध्देश्वर परिवार जसे देते तसे घेते आणि माजी पंतप्रधान स्व . अटलबिहारी वाजपेयी यांनी एका भाषणात इस देश की जनता छप्पर फाडके देती हैं और छप्पर फाडके लेती भी हैं असे सूचक विधान केले होते हे विजयकुमार देशमुख यांनी विसरू नये . विजयकुमार देशमुख यांनी यापुढे श्री सिध्देश्वर परिवारातील संस्थांच्या विरोधात कटकारस्थान करू नये , असे आवाहन धर्मराज काडादी यांनी केले आहे तसेच मी मैदानातच आहे असे आव्हान देत बोरामणी विमानतळ विकास आणि श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बचाव समितीची स्थापना काडादी यांनी जाहीर केली . धर्मराज काडादी , अॅड . रा . गो म्हेत्रस , प्रा . रावसाहेब पाटील , सिध्देश्वर कल्याणशेट्टी , सुभाष शेजवाळ , अमोल हिप्परगी , दत्ता थोरे , प्रा . राज चव्हाण , अशोक बिराजदार हरिभाऊ कुलकर्णी आणि दिनेश शिंदे ही समिती बोरामणी विमानतळ विकास आणि श्री सिध्देश्वर साखर कारखाना बचाव व तूर्त होटगी रोड येथील विमानतळावरून एकाच बाजूने विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वच स्तरावर पाठपुरावा करणार आहे .

Previous Post

रश्मिका मंदाना सुंदर लाल लेहंग्यात इंटरनेटचे तापमान वाढवत आहे

Next Post

पत्रकारांमुळे लोकशाही मजबूत :- आ. प्रणिती शिंदे

Related Posts

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
Next Post
पत्रकारांमुळे लोकशाही मजबूत :- आ. प्रणिती शिंदे

पत्रकारांमुळे लोकशाही मजबूत :- आ. प्रणिती शिंदे

ताज्या बातम्या

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026