सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून मारुती देवस्थान पटांगण बापूजी नगर येथे सभा मंडप बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बीपीनभाई पटेल हे होते तसेच माजी महापौर संजय हेमगड्डी, मोची समाज शहर अध्यक्ष देवेंद्र भंडारे, माजी अध्यक्ष नरसिंह आसादे सर, माजी अध्यक्ष दिनेश म्हेत्रे, जांबमुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर चे अध्यक्ष कृष्णा म्हेत्रे, माजी अध्यक्ष हनुमंतु जंगम, नरसिंग म्हेत्रे, सिद्राम फुले, अंजनकुमार म्हेत्रे, हनुमंतु सायबोळू, यल्लप्पा बुगले, मोहन बुगले, प्रकाश तल्लारे यांच्या इतर मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.