• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजकीय सत्तासंघर्षाचा आज आठवा दिवस

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2022
in मुख्य बातमी
0
राजकीय सत्तासंघर्षाचा आज आठवा दिवस
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा आठवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही अजून थांबल्या नाहीत.

22 जून 2022

एकनाथ शिंदेंचं बंड तीव्र…

शिंदेंसोबतचे सर्व आमदार सुरतमधून गुवाहाटीला निघण्याच्या तयारीत…

कार आणि बसमधून शिंदे समर्थक आमदार विमानतळाकडे रवाना…

शिवसेना आमदारांनी कोणतही बंड केलेलं नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

गुवाहाटीला रवाना होण्यासाठी शिंदेंसह समर्थक आमदार सुरत विमानतळावर दाखल

शिदेंसोबत शिवसेनेचे 33 तर इतर दोन आमदार

एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गुवाहाटी विमानतळावर दाखल

विमानतळावरुन सर्व आमदार गुवाहाटीच्या ब्ल्यू रेडिसन हॉटेलमध्ये

शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडू शिंदेंसोबत गुवाहाटीत

गुवाहाटीमध्ये पोहचताच एकनाथ शिंदे पुन्हा कॅमेऱ्यासमोर

आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

एकनाथ शिंदेंना जवळपास 50 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंचं वक्तव्य, बच्चू कडू शिंदेंसह गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती

ठाण्यातले 5 आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या सोबत ठाण्यात आणखीन काही नगरसेवक स्टँड बाय मोड वर असल्याचीही माहिती

देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक… शरद पवार सिल्व्हर ओकवरील बैठक आटोपून वाय. बी. चव्हाण सेंटरला

महाराष्ट्रातील राजकीय पेचावर खासदार संजय राऊतांचं ट्विट, ‘राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा, बरखास्तीच्या दिशेनं’, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे एकप्रकारे राऊतांकडून संकेत, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या कार्यालयात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह… मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थिती

दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य, शिवसेना आणि भाजपनं एकत्र राहायला हवं असं केसरकर म्हणाले.

“मला उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं” शिवसेनेतील बंडावर संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नारायण राणे दाखल

शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले शिदेंकडून सुनील प्रभूंची प्रतोद पदावरुन उचलबांगडी

राज्यात राजकीय घडामोडींना वेग अपक्ष आमदार गीता जैन आणि बविआचे क्षितीज ठाकूर फडणवीसांच्या भेटीला तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे… उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. “मी राजीनामा तयार करुन ठेवलाय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको हे समोर येऊन सांगा” उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना समोर येण्याचं आव्हान

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्वीट, “होय, संघर्ष करणार” राऊतांचा ट्विटमधून विरोधकांना टोला

गुवाहाटीला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परत आले. त्यांनी माध्यमांसमोर येत आपल्याला मारहाण झाल्याचं आणि जबरदस्ती नेल्याचं सांगत हे सगळं भाजपचं षडयंत्र असल्याचा दावा केला.

23 जून 2022

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र

शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली, मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरु झालं

कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा, सुरुवात सुनील प्रभूंपासून करा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल झालं

राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं

गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन केलं

आमदारांना डांबून ठेवण्यामागेही भाजपचाच हात असल्याचंही संजय राऊत राऊतांनी सांगितलं. शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा नवा दावा केला

‘ही आहे आमदारांची भावना’; एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट केलं. हे पत्र आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं ज्यात बडव्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री भेटत नसल्याची तक्रार होती

पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं

एक दिवस आधी एकनाथ शिंदेंविरुद्ध आंदोलन करणारे सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार शिंदे गटात गेले, यानंतर सदा सरवणकर गद्दार म्हणत शिवसैनिक आक्रमक, मुंबईत बॅनरला काळं फासलं

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर आला

कृषीमंत्री दादा भुसेही एकनाथ शिंदे गटात जाऊन पोहोचले

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले

शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा दावा केला तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही”

सुटका करून पळून आल्याचा नितीन देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो जारी करत दिला पुरावा

नाना पटोले म्हणाले…अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे, निधी देत नसत

एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही?, शरद पवार गृहखात्यावर नाराज

का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण

आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला

बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!

भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य, तर शिंदेंच्या मागे भाजपच, अजित पवारांना त्याची माहिती नाही, बंडखोरांना इकडे यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले

एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी नार्वेकरांसोबत सूरतला गेलेले फाटकही शिंदेंच्या गटात, गुवाहाटीत दाखल

बंडखोरांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल; नारायण राणेंची थेट शरद पवारांना धमकी

12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी केली तर आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, खरी शिवसेना आमचीच; कारवाईसंबंधी शिवसेनेच्या पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा इशारा

जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश

24 जून 2022

बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली

एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही : चंद्रकांत पाटील

अजय चौधरी, सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात एकनाथ शिंदे हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं

शिवसेनेकडून शिंदे गटातील आणखी चार आमदारांच्या अपात्रतेची मागणी; एकूण 16 आमदार लिस्टमध्ये…

आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा; उद्धव ठाकरे यांचं आवाहन, उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान… हीच वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार

नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा; अपक्ष आमदारांचे पत्र

शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक, दोन तासांनी संपली बैठक

बंड करण्यासाठी मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ निवडली, आता आपण लढायचं आणि जिंकायचं, आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

तुम्ही निवडून आलेल्यांना फोडून दाखवाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपला आव्हान

25 जून 2022

‘भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय’, सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल, एकनाथ शिंदेंना बाबा ‘योगराज’ची उपमा; गुवाहाटीत योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू गांजा दिला जातो काय असाही आरोप

एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली; चर्चेसाठी शिष्टमंडळ स्थापन करणार असल्याची माहिती समोर

शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय, आमदार संजय शिरसाट यांचा आरोप

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; आदित्य ठाकरेंचे मुंबईत मेळावे घेण्याचं जाहीर

शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, संजय राऊतांचं माध्यमांशी बोलताना वक्तव्य

एकनाथ शिंदे यांचा नवा आरोप; राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांचे संरक्षण काढले तर गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

बंडखोर आमदार तानाजी सावंतांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिक आक्रमक, सावंत यांच्यासह काही बंडखोर आमदार, खासदारांची कार्यालयं फोडली, ठाण्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदेंचंही कार्यालय फोडलं, नाशिकमध्येही शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला काळे फासले, शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागरांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक, घरावर हल्लाबोल मोर्चा
शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती समोर आली

आमदारांप्रमाणे शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदार बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांचा दावा

स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात; विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली नोटीस

पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच; एकनाथ शिंदे गटाचे स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात शक्तीप्रदर्शन, श्रीकांत शिंदेही उपस्थित

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री ते बंडखोरांची मंत्रीपदं 24 तासांत जाणार, संजय राऊत यांचं माझा कट्ट्यावर रोखठोक भाष्य

विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

‘मविआ’चा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

‘जे गेले ते गेले…आमचे नवे उमेदवार जिंकण्यासाठी सज्ज आहेत’, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेनेत राजीनामा नाराजीनाट्याला सुरुवात, ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा

एकनाथ शिंदे समर्थकांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला, हॉटेलचं बुकिंग वाढवलं

26 जून 2022

‘आना ही पडेगा, चौपाटी में’; नरहरी झिरवाळांचा भन्नाट फोटो टाकत संजय राऊतांचं खोचक ट्वीट

शिवसेनेत बंड: ‘सिल्वर ओक’वर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबतं

‘फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या’; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ हल्लाबोल

हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरं जा, संजय राऊतांचं माध्यमांशी बोलताना चॅलेंज

बंडखोर आमदारांच्या घरांना आता केंद्राची सुरक्षा, आमदारांच्या घराबाहेर CRPFचे जवान तैनात

आमची भिकाऱ्यासारखी परिस्थिती झाली होती; उद्धव ठाकरेंबद्दल सत्तार यांची नाराजी

दहिसरमधील सभेत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. संजय राऊत थेटच बोलले, ‘प्रताप सरनाईकांनी सांगितलं फडवणीस मला अमित शाहांकडे घेऊन गेले अन् माझं ईडीचं मॅटर साफ झालं’, संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर आमदारकीचे राजीनामे द्यावे

मुख्यमंत्री पदाबाबत विचारल्यानंतरही शिंदेंचं बंड, बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे

राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोनातून बरे झाल्यावर राजभवनावर पोहोचले

मंत्री उदय सामंतही नॉट रिचेबल, एकनाथ शिंदे गटात सामिल

ठाकरे नाव न लावता मैदानात या, मग तुम्हाला तुमची किंमत कळेल; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

शिवसेनेच्या बंडखोर गटावर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करणे शक्य असल्याचे शिवसेनेने म्हटले. बंडखोरांना आपला गट एखाद्या पक्षात विलीन करावाच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील माफिया सरकारचा अंत जवळ आला, किरीट सोमय्यांची टीका

ठाकरे सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा : शरद पवार

‘महाराष्ट्रातील मविआ सरकार आणखी दोन-तीन दिवस चालणार’, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा इशारा

शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू, विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेचाही पर्याय?

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ सुप्रीम कोर्टात, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाकडून याचिका. शिंदेंच्या बाजूने लढणार हरीश साळवे, तर ठाकरे सरकारकडून कपिल सिब्बल मैदानात

आमचे नेते उद्धव ठाकरेच, उर्वरीत 14 जणांनी आमच्यासोबत यावे : दीपक केसरकर

कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत: एकनाथ खडसे

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात हायअलर्ट; मुंबई, एमएमआरडीए भागात विशेष खबरदारीच्या सूचना

दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांचं सेना समर्थन कशी करू शकते? संजय राऊतांच्या विधानावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

27 जून 2022

सुप्रीम कोर्टानं बंडखोर आमदारांना 11 जुलैपर्यंत दिलासा दिल्यानं आता सत्तासंघर्षाचा पुढचा अंक राजभवनात दिसणार आहे. कोर्टानं 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईला संरक्षण दिल्यानं आता शिंदे गटात हालचाली सुरु झाल्यात. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या आदेशात विश्वासदर्शक ठरावाववर कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आता विश्वासदर्शक ठरावाचा पर्याय खुला झालाय.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपच्या आजच्या बैठकीत अविश्वास ठरावाबाबत चर्चा झाली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गुवाहाटी ते भाजपच्या बैठकीत खलबतं सुरु आहेत. त्यामुळे आता ही लढाई राजभवनाकडे कूच करतेय.

‘बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढल्याचं पत्र मिळालं नाही’, याचिकेत पाठिंबा काढल्याच्या उल्लेखावर राजभवनाचं स्पष्टीकरण

ठाकरेंकडून याआधीच दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी होती. 21 आणि 22 रोजी मुख्यमंत्री राजीनामा देणार होते. तर पवारांनी ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखलं, सूत्रांची माहिती

सत्तासंघर्षाचा पुढचा अंक राजभवनाच्या दारात दिसणार. पाठिंबा काढल्याचं पत्र शिंदे गट राजभवनाला पाठवणार. पत्रानंतर ठाकरेंना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागणार

राज्यातील अस्थिर स्थितीवर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलंय.

Previous Post

खताचा साठा केल्यास दुकानदारांवर गुन्हे दाखल करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

Next Post

भाजप-शिंदे गटाचं ठरल्यास.. असा असणार नव्या संभाव्य सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला?

Related Posts

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
Next Post
भाजप-शिंदे गटाचं ठरल्यास.. असा असणार नव्या संभाव्य सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला?

भाजप-शिंदे गटाचं ठरल्यास.. असा असणार नव्या संभाव्य सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला?

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026