येस न्युज मराठी नेटवर्क : मोहोळ येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी माजी आमदार राजन पाटील, जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत माने यांच्या संकल्पनेतुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,समाज कल्याण सोलापूर यांचे मार्फत अनुसुचित जाती प्रवर्गातील भुमीहीन नागरिकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअतर्गत ४ एकरापर्यत कोरडवाहू किंवा २ एकर पर्यत बागायत जमीन क्षेत्र चे वाटपा संबंधी अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित शिबीर संपन्न झाले. यावेळी तहसीलदार प्रशांत बोडसे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आडे, प्रकाश चवरे,जालिंदर लांडे,शिवाजी सोनवणे,कालिदास गावडे,धनाजी गावडे, दयानंद राऊत,रामभाऊ शेळके,पोपट जाधव,राजू सलगर,आण्णा बंडगर,तानाजी बनसोडे,सुवर्णा झाडे,कल्याण काळे सह इतर उपस्थित होते.