• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2022
in मुख्य बातमी
0
तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री पवार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांची पावनभूमी श्रीक्षेत्र अरणला देशात महत्व आहे. या तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून ब दर्जाच्या तीर्थक्षेत्राला अ दर्जा देण्याचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

अरण ता. माढा येथे सावता परिषदेत श्री पवार बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सर्वश्री आमदार बबनराव शिंदे, शहाजी पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, सतीश चव्हाण, माजी आमदार दीपक साळुंखे, उद्योजक शंकरराव बोरकर, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे आदिसह मान्यवर उपस्थित होते.

श्री पवार म्हणाले, श्रीक्षेत्र अरणच्या विकासासाठी लागणारी जमीन संपादित करण्यात येईल. सावता महाराज समाधी, अरण ते आष्टी पालखी मार्ग या कामासाठी निधी कमी पडणार नाही. श्री क्षेत्र अरणच्या विकासासाठी अपेक्षांची पूर्तता शासन करेल. समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी समाज सुधारकांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले काम हेच पूजा ही सावता महाराजांची शिकवण आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने हे सरकार काम करीत आहे. त्यांचे विचार आणि संस्कार यावर पुढचा मार्ग निवडूया.

समता आणि समानता यांची शिकवण देणारे सावता महाराज समाजाचे दिशादर्शक होते. सावता परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम होत आहे. वंचित, दुर्लक्षित वर्गाला इतरांबरोबर आणण्यासाठी हे शासन प्रयत्न करीत आहे. राज्यातील सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. राजकारणातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती करीत आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पवार यांनी सांगितले.

मुंडे म्हणाले, श्रीक्षेत्र अरण येथे दरवर्षी सावता परिषद व्हावी. हे तीर्थक्षेत्र ब दर्जाचे अ दर्जाचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊ. हे तीर्थक्षेत्र देशातील सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न केला जाईल. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीला अरण याठिकाणी येत असल्याने या ठिकाणाला खूप महत्व आहे.

पालकमंत्री श्री भरणे म्हणाले, सावता महाराज आणि श्रीक्षेत्र अरण यांच्या विकासाला शासन सर्वोच्च प्राधान्य देईल. हे तीर्थक्षेत्र उपेक्षित राहणार नाही. इतर तीर्थक्षेत्रासारखा विकास करण्याचा शासन प्रयत्न करेल. चाकणकर म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडे उघडली. यामुळेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत आहेत. प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता स्वयम् रोजगारातून उभे रहावे. या सावता परिषदेतून महात्मा फुले यांच्या समतेचा संदेश महाराष्ट्रात घेऊन जाऊया. यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी विचार व्यक्त केले.

Previous Post

महसूल मंत्री थोरात यांच्यासह दिग्गज कलाकारांची सचिन खरात यांच्यावर कौतुकाची थाप

Next Post

सोलापूरकरांनो सावधान ! अधिकाऱ्यांवर गुन्हे, स्मार्ट सिटीबाबत संताप वाढवणारी बातमी …!

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
सोलापूरकरांनो सावधान ! अधिकाऱ्यांवर गुन्हे, स्मार्ट सिटीबाबत संताप वाढवणारी बातमी …!

सोलापूरकरांनो सावधान ! अधिकाऱ्यांवर गुन्हे, स्मार्ट सिटीबाबत संताप वाढवणारी बातमी …!

ताज्या बातम्या

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026