सोलापूरकरांनो सावधान ! अधिकाऱ्यांवर गुन्हे, स्मार्ट सिटीबाबत संताप वाढवणारी बातमी …!

0
46

येस न्युज मराठी नेटवर्क (शिवाजी सुरवसे) : सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ त्रंबक ढेंगळे पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या 9 अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. स्मार्ट सिटी मधून बाळीवेस येथे बसविण्यात आलेल्या लाईटच्या डीपीचा करंट लागून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा ठपका डेंगळे पाटील यांच्यासह अधिकार्‍यांवर ठेवला आहे. आता या घटनेनंतर तरी स्मार्ट सिटी कंपनीचे कामकाज सुधारेल का आणि अधिकाऱ्यांना शहाणपण येईल का हा खरा प्रश्न आहे. आज सकाळी सोलापूर शहरातील काही प्रमुख रस्त्यावरचं दिसणार हे दृश्य. डीसीसी बँक, लकी चौक, सरस्वती चौक, पार्क चौक, फौजदार चावडी च्या समोरील हॉटेल रोहीत, रामलाल चौक या ठिकाणचे दृष्य पाहिल्यानंतर सोलापूर शहरातील नागरिकांचा संताप वाढेल असेही दृश्य आहे. कोट्यावधी रुपये स्मार्ट सिटी कंपनीतून खर्च करून अनेक ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम करायचे होते मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केले . अधिकाऱ्यांनी यामध्ये टक्केवारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी उघड्या कॅबल्स, डीपी, नागरिकांना मृत्यूचे आमंत्रण देत आहे. गेल्या वर्षभरापासून हे असेच दृश्य आहे तरीही महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी यांच्यात तू तू ..मे मे सुरू असल्यामुळे मूळ कामाकडे दोघांचेही लक्ष नाही. यामुळे 600 ते 700 कोटी रुपये खर्च करून ज्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचे रस्ते ड्रेनेज चेंबर करण्यात आले त्याचप्रमाणे लाईट च्या कामाची देखील बोंबाबोंब आहे त्यामुळेच सोलापूरकरांनो. जपून जा नाहीतर स्मार्ट सिटी च्या लाईट च्या केबल तुम्हाला मृत्यूच्या दाढेत घेऊन जातील एवढंच सांगणं…!